सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शुभमंगल सामूहीक विवाह योजनेसाठी अर्ज सादर करावे*

महिला व बाल विकास विभागामार्फत शुभमंगल सामूहीक विवाह योजना

Sudarshan MH
  • May 17 2022 1:35PM

नंदुरबार, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : महिला व बाल विकास विभागामार्फत शुभमंगल सामूहीक विवाह योजना राबविण्यात येत असून खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय तसेच नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या विशेष पॅकेज मधून  जिल्ह्यातील नोंदणीकृत  स्वंयसेवी संस्थामार्फत सामूहिक विवाह योजना राबविण्यात येणार असून विवाह करणाऱ्या जोडप्यास 10 हजार व संस्थेस एका जोडप्यामागे 2  हजार अनुदान देण्यात येणार आहे. संस्थेने योजना राबवितांना कमीत कमी 5 वधू- वरांचा गट करणे आवश्यक राहील. तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दाम्पत्यांनाही या योजनेद्वारे 10 हजार रुपये लाभ देण्यात येईल.

नोंदणीकृत संस्था, तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासगर्वीय दाम्पत्यांनी अधिक माहितीसाठी तसेच विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला,कक्ष क्र.226, टोकरतलाव रोड नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047/ 9284888233) वर संपर्क साधावा.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार