सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुझलॉन पवन उर्जा टॉवरमधील कॉपर वायरची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद,

8 आरोपी अटकेत, 1 लाख 35 हजार रुपये किमंतीच्या मुद्देमालासह 03 गुन्हे उघडकीस

Nandurbar. MH
  • May 15 2022 6:15AM


 

  


दि.10/05/2022 रोजीचे रात्री बलवंड गावाचे शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवर क्रमांक सीके 11 येथून 1,00,000/- रुपये किंमतीची  पवन चक्कीत वापरात येणारी 525 मीटर ताब्यांची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने श्री. वना भावराव पाटील, वय-56 वर्ष, धंदा- सुपरवायझर, सुझलॉन कंपनी, रा. शनिमांडळ, ता. जि.नंदुरबार यांनी दि.12/05/2022 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरून गुरनं.157/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

तसेच दि.11/05/2022 रोजी नंंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील ढंढाणे गावाचे शिवारादेखील  सुझलॉन पवन उर्जा कंपनीचे टॉवर क्रमांक के-03 चे एच टी यार्ड मधील ट्रान्सफॉर्मर बॉक्समधून 10,000/- रुपये किंमतीचे ताब्यांच्या बसबार पट्टया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने श्री. तुकाराम सुकदेव झावरे, वय-51 वर्ष, यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरून गुरनं.158/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

तसेच दि. 12/05/2022 तिलाली शिवारातील टॉवर क्र. 430 मधून 25,000/- रु. किमतीची 50 मीटर तांब्याची वायर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने श्री. राजेंद्र चिंतामण पाटील वय-49 यांचे फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं.159/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाख़ल करण्यात आला होता.

 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री.पी.आर.पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक मा. श्री.विजय पवार यांनी गुन्हा उघडकीस आणुन मालमत्ता हस्तगत करणे व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाणे यांना आदेशीत केले होते.

 

नंदुरबार जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. पी.आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली, गुन्हयातील चोरीस गेलेली ताब्यांच्या बसबार पट्टया ह्या रजाळे येथील पवन ऊर्फ प्रशांत कोळी व त्याचे मित्र यांनी मिळून चोरी केल्या आहेत.

 

सदर बातमी मिळाल्यावरुन मा.पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांनी तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन गुन्ह्यात सहभाग असलेले सर्व आरोपी व गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल विकत घेणारे यांची माहिती काढुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

 

मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ रजाळे व ढंडाणे येथे पाठवुन संशयीतास ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रजाळे गावात संशयीत आरोपी पवन कोळी याचा शोध घेतला असता तो त्याच्या शेतात मिळून आला व त्याच्या सोबत त्याचे मित्र सुकदेव कोळी व शेरसिंग ठाकरे हे देखील मिळून आले. त्यांना त्यांचे नावे विचारले असता 1) पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी, वय-19 वर्ष, रा. रजाळे, ता.जि.नंदुरबार, 2) सुकदेव आंनदा कोळी, वय-24 वर्ष, रा. रजाळे, ता.जि.नंदुरबार 3) शेरसिंग ऊर्फ पिन्या चंदुठाकरे, वय-26 वर्ष, रा. ढंढाणे असे सांगीतले. त्यांना सुझलॉन तार चोरी बाबत विचारपुस केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. म्हणून त्यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे आणुन पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी विश्वासात घेवुन विचापुस केली असता त्यांनी दिनांक 11/5/2022 रोजी  ढंडाणे गावाचे शिवारातील सुझलॉन पवन उर्जा कंपनीचे टॉवर क्रमांक के-03 चे एच.टी. यार्ड मधील ट्रान्सफॉर्मर बॉक्समधून चोरी केल्याचे मान्य केल्याने पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी याचेकडून 10,000/- रुपये किंमतीचे ताब्यांच्या बसबार पट्‌ट्या कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत केले.

 

सदर आरोपींकडे अधिक विचारणा केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारांसह इतर काही गुन्हे केले असल्याचे कबुल करुन त्याच्या इतर साथीदारांबाबत माहीती दिली. त्यामुळे त्यांचे साथीदरांपैकी नामे 1) देविदास भाईदास भिल, रा. शनिमांडळ (तिलाली), 2) हिरामण भिल, रा. तिलाली, ता.जि.नंदुरबार 3) आनंदसिंग भिल, रा. बलवंड, 4) रविंद्र भिल, रा. तिलाली, ता.जि.नंदुरबार, यांचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले.

 

संशयीतांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्यात चोरी केलेली तांब्याची तार ही दोंडाईचा येथील सईद मुसा खाटीक यास विकल्याचे सांगितले. त्यामुळे दोंडाईचा येथ सईद मुसा खाटीक, वय-32 वर्ष, रा.राणीपुरा होळी चौक, दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यास विचारपुस केली असता त्याने देविदास भिल व त्याचे इतर साथीदार यांच्याकडून विकत घेतलेली

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार