दुचाकीच्या डिक्कीतुन सव्वा सहा लाख लंपास, महिला व पुरुषावर गुन्हा खेतियाच्या व्यापाऱ्यांची फसवणूक
शहादा- होंडा युनिकॉर्न मोटारसायकली ने आलेल्या दोन अज्ञात महिला व पुरुषाने खेतियाच्या व्यापाऱ्यांची दुचाकी अडवून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले सव्वा सहा लाख रुपये लंपास केल्याची घटना शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील श्री हॉस्पिटल समोर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, व्यापारी संतोष भवरलाल कोठारी रा.खेतिया हे दि.१३ मे रोजी दुपारी एक वाजता शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील श्री हॉस्पिटल समोरुन आपल्या मोटारसायकली ने जात असताना होंडा युनिकॉर्न मोटारसायकली ने आलेल्या दोन अज्ञात महिला व पुरुषाने गाडी थांबवुन तुम पिछे देखके गाडी नहीं चला सकते क्या,असे बोलून त्यांच्या दुचाकींची चावी काढुनी घेतली.संतोष कोठारी हे दुचाकींची चावी परत मागत असतांना सदर महिलेने तुम मेरे तरफ देख रहे हो,असे सांगून बोलण्यात गुंतवून त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ६लाख३३हजार १४०रुपये रोख रक्कम चोरुन नेली.याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात भादंवि कलम४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोस ई जितेंद्र पाटील करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प