शिक्षकाचे सोन्याचे बिस्कीट व तीन लाखांची रोकड चोरली कोकणी हिल परिसरात घरफोडी
नंदुरबार- शहरातील कोकणी हिल परिसरात साईबाबा नगरात
नंदुरबार- शहरातील कोकणी हिल परिसरात साईबाबा नगरात कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी शिक्षकांच्या घरात घरफोडी करून सोन्याचे बिस्कीट, दागिने व तीन लाखांची रोकड चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोकणी हिल च्या साईबाबा नगरात राहणारे शिक्षक शिवाजी पितांबर चौधरी हे आपल्या कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले होते.चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधुन दरवाजा चा कडीकोंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरातील लोखंडी कोठीत व लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, सोन्याचे बिस्कीट व ३ लाख रुपये रोख,असा ऐवज लंपास केला.सदर घटना ११ ते १३ मे दरम्यान मध्यरात्री घडली. चौधरी कुटुंब घरी परत आल्यावर त्यांना चोरी प्रकार कळला.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उप निरीक्षक माधुरी काकटे करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प