सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा येथे लाच घेताना तहसीलचा कनिष्ठ लिपीक व पंटरला अटक.

शहादा- कोर्टातील जामीन साठी आवश्यक असलेल्या सॉलव्हन्सी प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात एक हजारांची लाच स्वीकारताना

Sudarshan MH
  • May 13 2022 7:10PM

शहादा- कोर्टातील जामीन साठी आवश्यक असलेल्या सॉलव्हन्सी प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात एक हजारांची लाच स्वीकारताना दि.१३ मे रोजी शहादा तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक व एका खाजगी पंटरला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा नातेवाईक नंदुरबार जिल्हा कारागृहात अटकेत होता.त्याचा जामीन करण्यासाठी सॉलव्हन्सी प्रमाणपत्र आवश्यक होते.त्यामुळे त्यांनी शहादा तहसील कार्यालयात सॉलव्हन्सी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता.सॉलव्हन्सी देण्याच्या मोबदल्यात तहसिलचे कनिष्ठ लिपीक पंकज दिगंबर आयलापूरकर यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती.याबाबत १३मे शुक्रवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खाजगी इसम कृष्णा सुदाम जगदेव रा.भादे ता.शहादा १००० रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.कनिष्ठ लिपीक पंकज दिगंबर आयलापूरकर व कृष्णा सुदाम जगदेव या दोघांना ताब्यात घेतले.याप्रकरणी शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कार्यवाही ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने,अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उप अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार ला.प्र.वि.चे पोलिस उप अधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक माधवी वाघ, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विलास पाटील,पोना.अमोल मराठे, ज्योती पाटील, विजय ठाकरे, संदिप नावाडेकर,देवराम गावीत, जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार