सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये

नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षणासाठी घटित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

Nandurbar. MH
  • May 13 2022 6:53PM




*नाशिक विभागातील नागरिकांची 22 मे 2022 रोजी नाशिक येथे जाणून घेणार मते*

नंदुरबार, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी, असे आयोगातर्फे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा.

*समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम असा* (अनुक्रमे दिनांक, वार, विभाग, वेळ, ठिकाणी या क्रमाने) : 21 मे  2022, शनिवार, पुणे, सकाळी 9.30 ते 11.30, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे. 22 मे 2022, रविवार, औरंगाबाद, सकाळी 9.30 ते 11.30, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद. 22 मे 2022, रविवार, नाशिक, सायंकाळी 5.30 ते 7.30, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक. 25 मे, बुधवार, कोकण, दुपारी 2.30 ते 4.30, विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन. 28 मे 2022, शनिवार, अमरावती, सकाळी 9.30 ते 11.30, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती. 28 मे 2022, शनिवार, नागपूर, सायंकाळी 4.30 ते 6.30, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार