सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दुचाकी चोरणाऱ्या सुलतानला मध्यप्रदेशातून अटक. गुन्हा शाखेची धडक कारवाई

नंदुरबार- शहरातील एका प्रेस फोटोग्राफर ची मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचून थेट मध्यप्रदेशातून अटक केली आहे.

Nandurbar. MH
  • May 9 2022 9:55PM

नंदुरबार-  शहरातील एका प्रेस फोटोग्राफर ची मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचून थेट मध्यप्रदेशातून अटक केली आहे.  
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वृंदावन कॉलनी येथे प्रेस फोटोग्राफर नितीन पाटील यांची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल दि.९ ते १० मे रोजी मध्यरात्री घ्या सुमारास अज्ञात चोरांनी चोरुन नेली होती.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी केला असता सदर दुचाकी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सनावद येथील सुलतान शेख व त्याचा साथीदार सुरत ठाकूर यांनी केल्याची गुप्त माहिती मिळाली.त्यानंतर एलसीबीचे पथक तातडीने सनावद येथे रवाना झाले.पथकाने ७ मे रोजी सुलतान रशिदशाह दिवान याला बाजारपेठेतून ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याला दुचाकी चोरी बाबत विचारणा केली असता त्याने चोरीची कबुली दिली.सदर दुचाकी नादुरुस्त झाल्याने मेनगाव येथे सोडून दिल्याची माहिती त्याने दिली.त्याचा साथीदार सुरत ठाकूर हा मिळून आला नाही.दुचाकी जप्त करण्यास मेनगाव पोलिसांना कळविले आहे.आरोपीला पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सदर कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक गौरव सिंह, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सपोनि संदिप पाटील, हवालदार महेंद्र नगराळे, प्रमोद सोनवणे, गोपाल चौधरी, राकेश मोरे, शोएब शेख, रामेश्वर चव्हाण,अभय राजपूत,आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार