भगवान विष्णूंची लाकडी मूर्ती विक्रीच्या बहाण्याने एकाला लुबाडले दिड लाख व मोबाईल हिसकावला चौघांवर गुन्हा दाखल
नंदुरबार- भगवान विष्णुंची लाकडी मूर्ती विक्री करण्याचा बहाणा करून फोन पे वर पैसे उकळुन त्यानंतर दुचाकीवर बसवून
नंदुरबार- भगवान विष्णुंची लाकडी मूर्ती विक्री करण्याचा बहाणा करून फोन पे वर पैसे उकळुन त्यानंतर दुचाकीवर बसवून प्रकाशा येथे नेत एकाला चौघांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून १ लाख ७० हजार रुपये रोख व दहा हजारांचा मोबाईल जबरीने घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,जिंगाली रवींद्र यादव रा.विशाखापट्टनम हे जानेवारी २०२२ ला पण.प्रवास करीत असताना करणं पवार याने ५० हजारांची भगवान विष्णूंची लाकडी मूर्ती २५ हजारावा देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर करण पवारांच्या मोबाईल क्रमांक ७५५९३३६९०२ यांच्यावर फोन पे वर मुर्ती घेण्यासाठी वीस हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम पाठवली.त्यानंतर नंदुरबार येथे हाॅटेल गौरव प्लाझा येथे दोन वेळा हजार रुपये त्यांच्याकडून घेतले.यानंतर करणचा मित्र मनोज पवार याने मोबाईल क्रमांक ८०१०८३३१७४ वरुन फोन करत सदर मूर्ती पाहिजे असेल तर दीड लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.त्यानंंतर जिंगाली यादव यांनी नंदुरबार बस स्थानक येथील एचडीएफसी बॅंकेच्या एटीएम मधून दीड लाख रुपये काढले.यानंतर ६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता मनोज पवार याने त्यांना प्रकाशा येथे मोटारसायकलने नेऊन तापी नदीच्या पुलाखाली घेऊन गेला.तेथे त्यांचे दोन साथीदार आले त्यांनी त्याला सुरा दाखवून मारहाण करून दिड लाख रुपये रोख व दहा हजारांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल घेऊन पळ काढला.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प