सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

व्यारा येथे २ तरुणींचा जबरीने धर्म करण्याचा परिवर्तनाचा प्रयत्न ख्रिश्चन कुटुंबाला कोर्ट कस्टडी

ख्रिश्चन कुटुंबाला कोर्ट कस्टडी

Sudarshan MH
  • Apr 26 2022 3:12PM

व्यारा:- शहरातील २ भावांनी आप-आपल्या प्रेमीकांना घरी बोलावून त्यांना जबरदस्तीने ख्रिश्चन बनविण्याची धार्मिक विधी केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी आई-वडिल व त्यांची तीन्ही मुलं अशा ५ जणांना अटक करुन कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्ट कस्टडी ठोठावण्यात आली आहे.
व्यारा शहरात या प्रकरणाचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.आदिवासी समाजातील दोन तरुणींना घरी बोलावून त्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला होता. सदर प्रकार दोघा मुलींनी आपल्या घरी सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. व्यारा शहरातील अंबिका नगरात राहणारे योहान आणि रसीने या दोघा भावांनी आप-आपल्या प्रेमीकांना घरी बोलावून घेतले.त्यानंतर त्यांच्या वडिलांनी तरुणींच्या हातात बांधलेले मंदिराचे पवित्र धागे कापून टाकले. कपाळावर व पायांना तेल लावल्यानंतर ओढणीने त्यांचे डोक्यावरील केस बांधून धर्मांतराचा विधी करण्यात आला. योहान घ्या वडिलांनी त्यांना तुम्ही अशुद्ध आहात. तुम्हाला शुध्द करण्यासाठी बोलावले आहे, असे सांगितले त्यानंतर त्या दोघी रडायला लागल्या.त्यानंतर मेणबत्ती पेटवून ख्रिश्चन विधी करण्यात आला.योहानचे वडील जे बोलायचे ते त्यांना बोलायला लावायचे.सदर प्रकार २१ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घडला होता.याप्रकरणी व्यारा पोलिस ठाण्यात योहान राकेश वसावा, राकेश काथुडीया वसावा,रेखा राकेश वसावा,राहीन राकेश वसावा, याकूब राकेश वसावा (सर्व रा.अंबिकानगर,व्यारा जि.तापी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्व आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.आरोपींना कोर्ट कस्टडी ठोठावण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार