सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार मनसे चा दणका , मशिदी वरील भोंगे न काढल्यास दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवणार

नंदुरबार मनसे चा दणका , मशिदी वरील भोंगे न काढल्यास

Nandurbar. MH
  • Apr 23 2022 10:39PM
मशिदींंवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार - नंदुरबार मनसेचा इशारा
नंदुरबार :- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींंवरील भोंगे काढावेत अन्यथा आठ दिवसांत मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठन करण्याचा इशारा नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी मनिषा खत्री व अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे,नंदुरबार विधानसभा अध्यक्ष सुनील कोकणी, नंदुरबार तालुका अध्यक्ष राकेश माळी,अशोक माळी,प्रविण जोशी यांनी निवेदन दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याचे समान अधिकार दिले आहे. तसेच इतर नागरिकांच्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होणार नाही असेही नमूद केले आहे. परंतु मशिदींंवरील भोंग्यामुळे इतर नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली होते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २०१८ रोजी दिलेल्या आदेशानुसार मशिदींंवरील भोंगे  उतरविण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशानुसार अद्याप कार्यवाही झालेली नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मशिदींंवर असलेले भोंगे उतरविण्याची तात्काळ कारवाई करावी अन्यथा नंदुरबार मनसेतर्फे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मशिदीसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार