सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रदूषण मुक्त नंदुरबारसाठी जैन सोशल युवा फोरमचा संकल्प

नंदुरबार (प्रतिनिधी गणेश वडनेरे नवापूर) सध्या कोरोना पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची मानवाला नितांत गरज असल्याचे दिसून आले.

Nandurbar MH
  • Jun 4 2021 10:02AM
 नंदुरबार (प्रतिनिधी गणेश वडनेरे नवापूर) सध्या कोरोना पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची मानवाला नितांत गरज असल्याचे दिसून आले. मात्र मानवाच्या चुकांमुळे संकट निर्माण झाले आहे. नंदुरबार शहर प्रदूषण मुक्त करण्याचा मानस व्यक्त करून जैन सोशल ग्रुप युवा फोरम प्लेटिनमतर्फे जागतिक सायकल दिनानिमित्त युवकांसाठी सायकलिंग क्लबचा शुभारंभ करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र धावपळीचे युग असून भौतिक सुखासाठी मानव इंधनाच्या वाहनावर स्वार होत आहे. वाढत्या वाहन संख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून ऑक्सीजन मिळणे कठीण झाले आहे. प्रदूषण मुक्त नंदुरबार होण्यासाठी शहरातील प्रत्येक 12 ते 25 वयोगटातील युवकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जैन सोशल ग्रुप युवा फोरम प्लेटिनमच्या प्रेसिडेंट जयती शाह यांनी केले आहे. दैनंदिन जीवनशैलीसाठी सायकलचा अवलंब करून कोविड संकटात ऑक्सिजन निर्मितीसाठी सर्व स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी 3 जून रोजी सायकलिंग क्लबचा शुभारंभ करण्यात आला आहे. या क्लबच्या माध्यमातून दर शनिवारी ,रविवारी सकाळी 6 ते 7 या वेळेत शहरातील विविध भागात सायकलद्वारे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यात येईल. या अभिनव उपक्रमाची संकल्पना जयति शहा यांची आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी जैन सोशल ग्रुप युवा फोरम प्लेटिनमच्या  अध्यक्षा जयती शाह, सचिव लब्धी जैन, खजिनदार सिद्धि जैन, हार्दिक बाफना, स्वरूप जैन, जय दोषी , झलक जैन , विधि जैन, अक्षिता कुवाडिया , निधि जैन , खुशी माहेश्वरी, हिमानी कावड़, मोक्षा जैनआणि सहकारी परिश्रम घेत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार