सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लुपीन फाऊंडेशनतर्फे लसीकरण जनजागृती अभियान

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.12: लुपिन ह्युमन वेल्फेअर ॲण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे कोविड लसीकरण जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आला.

Nandurbar MH
  • May 12 2021 4:35PM

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.12: लुपिन ह्युमन वेल्फेअर ॲण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे कोविड लसीकरण जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसिलदार उल्हास देवरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, लुपिन फाऊंडेशनचे दिपक जाधव आदी उपस्थित होते.

नंदुरबार वगळता इतर पाच तालुक्यात  वाहनावरून ध्वनीक्षेपक आणि फलकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी 10 गावात लसीकरणाबाबत आवाहन करण्यात येणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे लसीकरणास प्रतिसाद वाढण्यास मदत होईल, असे डॉ.भारुड यांनी यावेळी सांगितले. दुर्गम भागात स्थानिक भाषेतून जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
 
लुपिन फाऊंडेशनचे  मुख्य व्यवस्थापक योगेश राऊत, प्रकल्प व्यवस्थापक  लक्ष्मण खोसे, प्रकल्प प्रमुख सुनील सैंदाणे यांच्या मार्गर्शनाखाली हे जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार