नांदेड दि.१५(अरविंद जाधव) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ची सर्वसाधारण 93 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी दु.2 वाजता सभेचे आयोजन कै, शंकररावजी चव्हाण सभाग्रहात घेण्यात आली याठिकाणी प्रमुख उदघाटक म्हणून नांदेड जिल्हाचे खासदार तथा बँकेचे जेष्ठ संचालक प्रतापराव पाटील चिखलीकर यानी आपल्या भाषणात आनेक विषयाला हात घातला व आजही हि बँक ग्रामीण भागातील व सर्वसामान्याचीच आसल्याची भावना व्यक्त केली.
ऐके काळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हि खरी शेतकऱ्याची कामधेनु म्हणून ओळखली जात होती. पण काही आडचनीमुळे या बँकेच्या व्यवाहारावर लोकाचा विश्वास कमी झाला व त्याचाच फटका बँकेच्या ठेवी व खातेदारावर झाला पण माझ्या विनंतीला कै.विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री आसताना 100 कोटी रुपये दिल्यामुळे आज आम्ही सचांलाक मंडळ आपल्या पुढे दिसत आहोत. आनेक नेते या जिल्हात आहेत पण या बँकेबद्दल व शेतकऱ्यांच्या आडचनी साठी कुंठही बोलताना दिसत नाहीत.यावर्षी पिकविमा.दुष्काळ अनुदान नुसते जाहिर करुन मोकळे झालेत पण शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कधी मिळणार आहे. का बोलाचाच भात-बोलाचिच कडी आसे होऊ नये मि या जिल्हाचा खासदार म्हणून आहे मि नेहमी शेतकऱ्यां सोबत आहे आसे ही आपल्या भाषणात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी मत व्यक्त केले.
या सर्वसाधारण सभेसाठी माजी खा.भास्करराव पाटील खंतगावकर.माजी आध्यक्ष व आ. बापुसाहेब देशमुख गोरठेकर.अध्यक्ष डाँ.सुनिल कदम.राजेश देशमुख कुंटुरकर.दिलीपभाऊ कंदकुर्ते.गगाधर राठोड.लक्ष्मणराव ठक्करवाड.मोहनराव पा.टाकळीकर.हरिहरराव भोसीकर आदि सचालक प्रमुख उपस्थित होते तर मागील सभेचा इतिवृत्तात वाचुन दाखवण्यात आला.सचालंक मडंळाचा अहवाल.ताळेबंद नफा-तोटा.अदाजंपत्रकातील खर्चास मान्यता देने.वैज्ञानिक लेखा परिक्षन.बँकेच्या थकीत बिगरशेती कर्जाची वसुलीसाठी सामोपचार करने.आसे एकुण नऊ ठराव माडण्यात आले व काही विषयाचे बँकेचे ठराव सुचक व अनुमोदक यानी माडले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ.अजय कदम यानी प्रास्तविक केले तर सर व्यवस्थापक अरिवंद पा,शिंदे यानी सर्वाचे आभार मानले या सभेसाठी नांदेड जिल्हाचे सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन व सर्व पतंस्थेचे चेअरमन सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.