सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रतिभा इंटरप्राईजेस चे प्रोप्रायटर मयुरेश राऊत यांच्यावर तुलिंज पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद असुन सुद्धा अद्यप आरोपीला अटक करण्यात आली नाही ।

नालासोपारा - ( मनीष गुप्ता ) तुळींज येथील प्रतिभा एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर मयूरेश जय प्रकाश राऊत यांनी बनावट बांधकाम परवानगी वापरून चार मजली इमारतीचे बांधकाम केले

Sudarshan MH
  • May 31 2021 4:59PM

92 सदनिकाधारकांची बनावट बांधकाम परवानगी बनवुन केली फसवणूक

नालासोपारा - ( मनीष गुप्ता ) तुळींज येथील प्रतिभा एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर मयूरेश जय प्रकाश राऊत यांनी बनावट बांधकाम परवानगी वापरून चार मजली इमारतीचे बांधकाम केले व इमारत  बांधकाम परवानगी खरी असल्याचे भासवून सिडको ,महानगरपालिका, सदनिकाधारक दुय्यम निबंधक यांची फसवणूक झाल्याचे उघड झाल्याने. वसई-विरार महानगरपालिकेचे प्रभाग समिती ब चे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांच्या आदेशान्वये अतिक्रमण लिपिक अक्षय मोखर यांनी तुळींज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून विकासक मयुरेश जयप्रकाश राऊत यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 52, 53, 54 अनुसार तथा भादवि कलम 465, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्हा नंबर  681/ 21 दिनांक 27 /5/ 2021असा आहे . सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोलंनकर करत आहेत .याबाबत चार दिवस होऊन सुद्धा आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत . मात्र यामुळे आता प्रभाकर भवन  साई वेल्फेअर सोसायटी मध्ये राहणाऱ्या 92 सदनिकाधारकाचे खरं भविष्य मात्र अंधारात आहे । 

वसई विरार महानगरपालिका द्वारे तुळींज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे गाव मौजे तुळींज सर्वे क्रमांक 121 हिस्सा नंबर 1 पैकी मध्ये प्रभाकर भवन श्री साई वेल्फेअर सोसायटी विजय नगर नालासोपारा पुर्व याठिकाणी एमआरटीपी व फौजदारी गुन्हा दाखल करण्या मराठी अक्षय अशोक मोखार यांना नियुक्त करण्यात आले होते . त्यानुसार त्यांनी पोलिस स्टेशनला जाऊन पुढील फिर्याद दिली . त्यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे गाव मौजे तुळींज सर 121 हिस्सा एक पैकी विजय नगर नालासोपारा पुर्व येथे विकास मे प्रतिभा इंटरप्राईजेस चे प्रोप्रायटर मयुरेश प्रकाश राऊत यांनी 4 मधली प्रभाकर स्मृती ( भवन ) नामक इमारतीचे अनधिकृत बांधकाम करताना बनावट सीसी चा (बांधकाम परवानगी) चा वापर केले असल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार सदर माहितीच्या आधारे  विजय पाटील व विभाग प्रमुख अनधिकृत बांधकाम विभाग प्रभाग समिती यांनी दिनांक 26/03/2019 रोजी सेक्रेटरी, चेअरमेन , प्रभाकर भवन, श्री साई वेल्फेअर सोसायटी विजय नगर नालासोपारा पुर्व यांना इमारतीचे बांधकाम परवानगी व त्याबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे पत्र दिले होते. मात्र त्यांनी कोणते ही कागदपत्र सादर केली नाहीत  त्यानंतर दिनांक 01/04/2021 रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक तीन , नालासोपारा यांना तसेच  उपसंचालक नगर रचना विभाग वसई विरार शहर महानगरपालिका यांना दिनांक 10/5/2021 रोजी पत्र पाठवून या बांधकामाची परवानगीच्या वैधतेबाबत खातरजमा केली होता तेव्हा ,नगर रचना विभाग कार्यातून सदर परवानगी बनावट असल्याचे व बनावट कागदपत्र वापरून बनवण्यात आली असल्याचे पत्र सहाय्यक आयुक्त ब यांना देण्यात आले. त्यानुसार सदर इमारतीचे निरीक्षण केले असता तेथे जी प्लस चार मजली प्रभाकर स्मृतिभवन ही बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले व त्या इमारतीमध्ये 92 सदनिका असल्याचे निदर्शनास आले. याकरता दिनांक 24/5/2021रोजी सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांचे साक्षीने विशिष्ट सहा प्रमाणे ची अनधिकृत बांधकाम संदर्भात नोटीस बजावण्याचा करता   स्वप्निल संखे कनिष्ठ अभियंता यांनी सदर नोटीस इमारतीच्या दर्शनी भागावर चिटकवली आहे त्याबाबत स्वप्निल संखे त्यांनी दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असून नोटीस  चिटकवताना फोटो काढले आहेत. एकंदरीत मौजे तुलिंज सर्वे नंबर 121 हिस्सा नंबर 1 विजय नगर नालासोपारा पुर्व येथे विकासक प्रतिभा एंटरप्राइजेस चेप्रोप्रायटर मयुरेश जयप्रकाश राऊत व इतर यांनी जी प्लस 4 मजली प्रभाकर स्मृतिभवन हि इमारत 92रूमचे बांधकाम केले आहे सदर इमारतीला  सिडकोची बनावट बांधकाम परवानगी वापरून सदर इमारती अधिकृत आहे असे भासवून ती ग्राहकांना विक्री करून ग्राहकांची तसेच शासनाची फसवणूक केली आहे. तरी मौजे तुळींज सर्वे नंबर 121 हीस्सा नंबर 1 विजय नगर नालासोपारा पुर्व येथे विकास  प्रतिभा इंटरपाईजेस चे प्रोप्रायटर मयुरेश जयप्रकाश  राऊत राहणार विजय नगर नालासोपारा पुर्व यांनी सदर जागेमध्ये सिडकोची बनावट बांधकाम परवानगी चा वापर करून जी प्लस4 मजली, प्रभाकर स्मृती भवन ही इमारत बांधली व त्या इमारतीमध्ये 92 रूम बांधले आहेत .सदर  बांधकाम  परवानगी खरी असल्याचे भासवून त्यातील सदनिका ग्राहकांना विक्री करुन सहाय्यक दुय्यम निबंधक व ग्राहकांची फसवणूक केली म्हणून  प्रतिभा इंटरप्राईजेस चे  प्रोप्रायटर मयुरेश जयप्रकाश प राऊत व त्यांना मदत  मदत करणाऱ्या इस मान विरुद्ध  भारतीय दंड विधान संहिता कलम 420, 465 ,467, 468 ,471 ,34 व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 52, 53 , 54 ,नुसार  शासनाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे । 
92 सदनिकाधारकां चे भवितव्य अंधारात 
नालासोपारा विजय नगर येथील  प्रतिमा इंटरप्राईजेस चे प्रोप्रायटर मयुरेश जयप्रकाश राऊत यांनी सर्वे नंबर 121 नंबर 1 पैकी मध्ये सिडकोची बनावट बांधकाम परवानगी वापरून व त्या ठिकाणी तळमजला अधिक चार मजले अशी अनधिकृत इमारत बांधली या इमारतीमध्ये 92 सदनिका बांधण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कागदपत्रांची कोणती माहिती नसल्याकारणाने त्यांनी ही बांधकाम  परवानगी खरी आहे असे म्हणून या ठिकाणी आपल्या आयुष्यभराची कमाई गुंतवून सदनिका खरेदी केलेले आहेत. मात्र आता सदर त इमारतीची बांधकाम परवानगी चावट असल्याचे उघड झाल्याने व ही इमारत बांधणारा विकासात मयुरेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे येथे राहणाऱ्या 92 सदनिकाधारकांची पायाखालची वाळू सरकली आहे या इमारतीचे पुढे काय होणार हे 92 सदनिका वाचणार का असा प्रश्न आता सदनिकाधारकांच्या मनात सुरू आहे .सदनिकाधारक सध्या गोंधळलेल्या अवस्थेत असून भविष्यात नेमकं काय करायचं याच्या विवंचनेत सदनिकाधारक आहेत.

गुन्ह्यात वाढ करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
नालासोपारा पूर्व धुळे तुळिज पोलीस ठाण्यांमध्ये प्रतिभा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर मयुरेश राऊत यांच्यावर बनावट बांधकाम परवानगी वापरून चार मजली अनाधिकृत इमारत बांधल्या प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाले आहेत. एकंदरीत गुन्ह्याचा प्रकार बघता तो गंभीर स्वरूपाचा असून यामध्ये अजून गुन्ह्यांची वाढ होणे गरजेचे असल्याची मागणी नालासोपारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. या प्रकरणात संघटितपणे 92 ग्राहकांची फसवणूक केल्याचे निदर्शने झाले आहे सर्वांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घ्यावा असेही सदर अर्जात म्हटले आहे त्यामुळे त्यांना मोफा अक्ट 1963 कलम 3,4,5, अन्वये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 कलम 3,4 ,अन्वये नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82, 83 इत्यादी प्रकारच्या गुन्ह्यांची वाढ करण्याची मागणी नालासोपारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असल्याचे सूत्रांकडून समजते ।

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार