सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री,बसपा अध्यक्षा मायावती यांच्यावर टीका करणाऱ्या रणदीप हुडा वर ऍट्रोसीटी ऍक्ट नुसार कारवाई करावी

नागपूर दि. ०१ - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री बहन मायावती यांच्यावर अत्यंत हीन अश्लील टीका

Sudarshan MH
  • Jun 2 2021 10:14AM
 - जयदीप कवाडे* 

नागपूर दि. ०१ -  बहुजन समाज पक्षाच्या  अध्यक्षा आणि उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री बहन मायावती यांच्यावर अत्यंत हीन अश्लील टीका केल्या बद्दल अभिनेते रणदीप हुडा यांचा तीव्र निषेध पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केला असून या प्रकरणी  रणदीप हुडा वर  ऍट्रोसीटी ऍक्ट नुसार कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जयदीप कवाडे यांनी केली आहे. 
 दलित बहुजन समाजाच्या नेत्या बहन मायावती यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. रणदीप हुडा सारख्या अभिनेते फिल्म इंडस्ट्री वर कलंक आहेत. जातीवाद आणि त्यातून समस्त महिला वर्गाचा अवमान करणारे वक्तव्य करून  रणदीप हुडा याची मानसिकता हीन आणि जातीयद्वेषाची दिसत आहे. रणदीप हुडा यांच्यावर फिल्म इंडस्ट्री ने बंदी घातली पाहिजे.त्याचा कोणताही चित्रपट आम्ही महाराष्ट्रत व संपूर्ण देशभरात चालू देणार नाही.त्याच प्रमाणे रणदीप हुड्डा वर त्वरित ऍट्रोसीटी  ऍक्ट नुसार कारवाई करून  तुरुंगात डांबले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार