सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दुचाकी चोरणारी टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

नागपूर ग्रामीणच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. मौदा तालुक्यातील लापका येथील उमेश ऑटोमोबाईल या गॅरेज मध्ये छापा घातला असता सतरा दुचाकी, दोन गाडीचे इंजिन आणि दुचाकी चोरणाऱ्या टोळीस ताब्यात घेतले.

Snehal Joshi .
  • Oct 5 2020 8:44PM
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षांपासून दुचाकी चोरीच्या बऱ्याच तक्रारी पोलिसांत दाखल होत्या. दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. अशातच नागपूर ग्रामीणच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. मौदा तालुक्यातील लापका येथील उमेश ऑटोमोबाईल या गॅरेज मध्ये छापा घातला असता सतरा दुचाकी, दोन गाडीचे इंजिन आणि दुचाकी चोरणाऱ्या टोळीस ताब्यात घेतले. उमेश शालिकराम सोनवाने रा. पावडदौना या मुख्य आरोपीसह साथीदार प्रमोद राजू गजबे, प्रीतम इंदल सोनवाने, अविनाश उर्फ विक्की राजू गजबे आणि आशिष उर्फ गोलू इंद्रपाल सोनवाने सर्व राहणार लापका आदी आरोपीना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गॅरेज मधून बजाज पल्सर, हिरो होंडा पॅसन, हिरो स्प्लेंडर, अक्टिवा, बजाज प्लॅटिना, बजाज सीटी १०० अशा विविध कंपनीच्या एकूण १७ दुचाकी आणि दोन दुचाकीचे इंजिन हस्तगत करण्यात आले. उमेश सोनवाने यांनी आपल्या साथीदारांसह मागील वर्षापासुन पासून ते this आजपावेतो मांढळ, खात, कोदामेंढी, मारोडी, लापका, रामटेक, तसेच भंडारा जिल्ह्यातील लाखनी, जवाहरनगर, शहापूर आणि नागपूर शहरातील पारडी या भागातून सर्व दुचाकी चोरल्याची कबुली केली. गुन्हे शाखेने सर्व वाहनांची तपासणी केली असता सर्व वाहने चोरीची असल्याचे निदर्शनात आले. याबाबत मौदा, अरोली, कुही, रामटेक तसेच भंडारा जिल्ह्यातील लाखनी, जवाहरनगर आणि नागपूर शहर येथील पोलीस ठाणे वाडी व नंदनवन आदी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी असल्याची नोंद आढळून आली. एकूण बारा लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कारवाई ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जीटटावार यांच्या आदेशाने सहा. पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक सचिन मत्ते, नरेंद्र गौरखेडे, जावेद शेख, आदींसह पथकाने केली. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार