सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली वचनपूर्तीचे काय?फडणवीस यांचा सवाल

भाजपच्या नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ भट सभागृहात आयोजित पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्यात बोलत होते.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले असून हेच दोन दिवस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत.हा मतदार संघ अडीच दशके ज्यांची देशात विकासपुरुष म्हणून ओळख आहे असे केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांचा गड आहे.गडकरी यांनी मंत्री म्हणून महाराष्ट्र बदलून दाखवला.विरोधी पक्ष् नेते म्हणून सरकारला हलवून दाखवले.हा पदवीधर मतदारसंघ नितीन गडकरी यांचाच मतदार संघ आहे.

Snehal Joshi . सौजन्य- सत्ताधीश
  • Nov 29 2020 11:37PM

नुकतीच काल २८ नोव्हेंबरर रोजी महाविकासआघाडीच्या सरकारची वर्षपूर्ती झाली,वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आॅन लाईन भाषण म्हणजे निव्वळ धमक्या,अशी पराकोटीची टिका करुन आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली मात्र वचनपूर्तीचे काय?असा सवाल माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष्ाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ते भाजपच्या नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ भट सभागृहात आयोजित पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्यात बोलत होते.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले असून हेच दोन दिवस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत.हा मतदार संघ अडीच दशके ज्यांची देशात विकासपुरुष म्हणून ओळख आहे असे केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांचा गड आहे.गडकरी यांनी मंत्री म्हणून महाराष्ट्र बदलून दाखवला.विरोधी पक्ष् नेते म्हणून सरकारला हलवून दाखवले.हा पदवीधर मतदारसंघ नितीन गडकरी यांचाच मतदार संघ आहे.

या पूर्वी आ.अनिल सोले यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना पर्यावरण व उद्योगाच्या क्ष्ेत्रात चांगले काम केले.मी संदीप जोशींना अतिशय जवळून ओळखतो.करोनाच्या काळात जनता ही अडचणीत असताना महापौर म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम केले मात्र याच काळात राज्य सरकार मात्र झोपून होती.संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच या काळात कोळमडून पडली होती.संदीप जोशी यांनी रस्त्यावर उतरुन जनतेसाठी काम केले.क्रीडा असो किवा सेवा क्ष्ेत्र संदीप जोशी हे आपल्या कार्यात अग्रणी राहीलेत.

करोना नंतर ही पहीलीच निवडणूक होत आहे.संपूर्ण देशात बिहार पासून तर मिझोरम पर्यंत असे उत्तर,दक्ष्ि ण,पूर्व,पश्‍चिम प्रत्येक दिशेतील राज्यात पंतप्रधान यांच्या विकासाच्या कामांवर मतदारांनी शिक्कामोतर्ब केले व प्रचंड मतांनी भाजप पक्ष्ाला निवडून दिले.आता महाराष्ट्रात पदवीधर व शिक्ष् क मतदार संघाची निवडणूक होत आहे.या निवडणूकीत तीन पक्ष् हे भाजप विरोधात एकत्रित आले आहेत.त्यांना असं वाटतंय की तिन्ही पक्ष् एकत्रित आले तर भाजपच्या उमेदवाराल सहज हरवून देऊ.मात्र ज्यांच्यासोबत जनता असते त्यांना कोणीच हरवू शकत नाही,त्यांना एकटं पाडू शकत नाही,हे विरोधकांना माहिती नसल्याचा टोला फडणवीस यांनी हाणला.

माेदींविरोधात २४ पक्ष्ांनी आघाडी केली होती मात्र जनता मोदींसोबत होती,असे ते म्हणाले.परिणामी तिन्ही पक्ष् एकत्रित आल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही.कालच या सरकारची वर्षपूर्ती झाली मात्र वचनपूर्तीचं काय?विश्‍वासघात करुन हे सरकार सत्तेवर आलं आहे.शिवसेनेने महाराष्ट्राच्या विधान सभेच्या निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही छायाचित्र आपल्या प्रचाराच्या बॅनरवर लावले आणि मोदींच्या मतदारांनी शिवसेनेला भरभरुन मत दिले.त्या निवडणूकीत ७० टक्के मत हे एकट्या भाजप पक्ष्ाला मिळाले होते.
मात्र शिवसेनेने जनतेचा विश्‍वासघात केला.मतदारांचा विश्‍वासघात केला.असंगाशी संग करुन सत्ता मिळवली.

वर्षपूर्तीत एक ही उपलब्धी नाही?
या सरकारला एक वर्ष होत आलं मात्र या सरकारकडे किवा सरकारच्या मंत्र्यांकडे एका वर्षातील एक ही उपलब्धी सांगण्यासाठी नाही,असा टोला त्यांनी हाणला. मंचावर बसलेले माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे बघत आमच्या सरकारने एका वर्षात किती उपलब्धी जनतेसमोर मांडल्या,हे मुनगंटीवार यांनाही माहिती असल्याचे ते म्हणाले.आपल्या वर्षपूर्तीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धमकावण्याशिवाय काहीच सांगितले नसल्याचा टोला त्यांनी हाणला.

विदर्भाच्या प्रति या आघाडी सरकारच्या मनात फक्त आणि फक्त चीड असल्याचा आरोप त्यांनी केला.विदर्भाला न्याय देणारे वैद्यानिक विकास मंडळच या सरकारने गुंडाळले.कापूस,तूर,सोयाबिनचा शेतकरी आज अतिवृष्टि व नैसर्गिक संकटाने संकटात असताना हे आघाडीच सरकार विदर्भाच्या शेतक-यांकडे ढूंकूनही पाहत नाही.मराठवाड्यालाही अशीच सापत्न वागणूक मिळतेय,असा आरोप त्यांनी केला.आज विदर्भात जे काही विकास प्रकल्प सुरु आहेत ते गडकरी यांच्याच खात्याने सुरु केलेले आहेत. आम्ही बळीराजा योजना सुरु केली होती ते ही पैसे परत जात आहे मात्र सिंचनासाठी बळीराजाला दिले जात नाही.

मुख्यमंत्री होण्यापूर्वी तुम्हीच शेतक-यांच्या बंधा-यावर जाऊन २५ हजार रु.प्रति हेक्टरी मदत करणार असल्याचे वचन दिले होते ना?मग ते वचन लक्ष्ात नाही मात्र भाजपने कधीही मुख्यमंत्री पदाचे त्यांना न दिलेले वचन मुख्यमंत्र्यानंा लक्ष्ात आहे,असा झणझणीत टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला.नुकतेच ठाकरे नावाचे शेतकरी मला भेटलेत,त्यांनी सांगितले त्यांची दोन एकर शेती आहे.मात्र विज बिल आले एक लाख रुपये! आता उर्जा मंत्र्यांनी ५० टक्के रक्कम माफ करण्याचे जाहीर केले तरी देखील २ एकर शेतीचे विज बिल ५० हजार रुपये त्यांना भरावे लागणार!

सरकार आहे की तमाशा?
उर्जा मंत्र्यांनी घोषणा केली १०० युनिटपर्यंत विज बिल माफ करणार,आता इतर मंत्री सांगतात उर्जा मंत्र्यांनी अभ्यास केला नव्हता,मग सांगितले जाते त्यांनी मंत्र्यांसोबत चर्चा केली नव्हती,मग सांगितले जाते त्यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती,उपमुख्यमंत्री सांगतात त्यांच्याशी विज िबल माफी बाबत चर्चाच झालीच नाही,उर्जा मंत्र्यांनी परस्परच घोषणा केली,ूमुख्यमंत्री सांगतात त्यांना यातलं काही माहितीच नाही,ही सरकार आहे की तमाशा?असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
नुकसान संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे होत आहे तर फायदा फक्त आघाडीच्या मंत्र्यांचा होत असल्याचा आरोप त्यांनी केला.पैसे घ्या आणि बदल्या करा,फक्त यातच हे मंत्री व्यस्त असल्याचे ते म्हणाले.

म्हणूनच पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही साधी नाही,त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला विजेचा शॉक दिला आहे आता जनताच त्यांना मतांचा शॉक देणार असल्याचे ते म्हणाले.सरकारी पक्ष्ाचे लाेक हे कामी लागले आहेत,त्यांनी ही निवडणूक जाती-पातीची केली आहे.जाती-जातीच तेढे निर्माण करुन त्यांना ही निवडणूक जिंकायची आहे. ही निवडणूक त्यांनी सवर्ण विरोधात ओबीसीची केली मात्र आमच्या सरकारने ओबीसींसाठी महाज्योतीच्या माध्यमातून अनेक सवलती दिल्या.उच्च शिक्ष् णासाठी परदेशातील १०० विद्यापीठात शिक्ष् ण घेण्याची संधी उपलब्ध केली.उद्योग निर्माण करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले.मात्र ओबीसींच्या कैवार घेणा-या सरकारने ही योजनाच थंड बस्त्यात टाकली.मराठ्यांना आरक्ष् ण देताना आम्ही स्पष्टपणे ओबीसींच्या आरक्ष् णाला सरंक्ष्ण कलमात टाकले.नुकतेच न्यायालयाने मराठ्यांच्या आरक्ष् णाला स्थगिती दिली असली तरी आेबीसींच्या आरक्ष् णाबाबत काहीच भाष्य केले नाही.ओबीसी आरक्ष् णाबाबत शंका उपस्थित करणारे बाहेर माध्यमांकडे बोलतात मात्र मंत्रिमंडळात त्यांची वाचा बंद होते,असा टोला फडणवीस यांनी लगावला.हे मंत्री फक्त ‘कन्फ्यूड राजकारण’ करीत असल्याचे सांगून आेबीसींच्या आरक्ष् णाला पंतप्रधान यांनी घटनात्मक कवच दिले असून मोदी यांनी ओबीसी आयोगाचीच स्थापना केली असल्याचे ते म्हणाले.

त्यामुळे पदवीधर निवडणूकीत ओबीसींच्या नावाखाली राजकारण करणा-यांचे राजकारण जनतेलाही माहिती आहे.या नाकर्त्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची हीच संधी आहे.गडकरी यांची जागा पूर्ण ताकदीने यावेळी देखील राखणार,असा प्रणच भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार दत्ता मेघे यांनी संदीप जोशी हे प्रचंड मतांनी जिंकून येणार असल्याचे भाकीत केले.माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचा पदवीधर मतदारसंघाचा उमदेवार हा अवघ्या दोन दिवसांनतर आमदार होणार असल्याचा विश्‍वासत वर्तवला.विरोधक इतके अस्वस्थ झाले आहेत की संदीप जोशी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असल्याची सोशल मिडीयावर अफवाह फैलवत आहेत.

माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतो तेव्हा ‘तुम्ही कधी येता’असा सरळ सवाल मतदार आम्हालाच विचारतात एवढे या आघाडी सरकारला जनता त्रस्त झाली असल्याचे ते म्हणाले.मी या निवडणूकीचा प्रमुख असल्यामुळेच मी काेराडी जगदंबा संस्थानातील ५ एकर जमीन बेकायदेशीररित्या तमिलनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या भारतीय विद्या भवन या ट्रस्टला दिले असल्याचा आरोप करीत माझ्या विरोधात पत्र परिषद ही घेण्यात आली.मात्र ही ट्रस्ट त्या ठिकाणी खासगी भवन न उभारता,भगवान श्रीरामांच्या जन्मापासून तर संपूर्ण जीवनकार्य उभारणा असल्याची माहिती त्यांनी दिली.म्हणूनच भाजपच्या उमेदवाराला आता इतक्या प्रचंड मतांनी विजयी करा की काँग्रसेच्या बगलबच्च्याला सहा वर्षांनतर देखील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची हिंमत होणार नाही,असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार