सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाज्योती कृती संघर्ष समिती, भाजयुमो आणि भाजपा ओ.बी.सी आघाडीच्या मागणीला यश..!

महाज्योती संस्थेअंतर्गत भटक्या विमुक्त, ओबीसी समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे संशोधन क्षेत्रातील शैक्षणिक समस्या सरकारने तात्काळ निकाली काढावे या मागणीसाठी बहुजन समाज कल्याण विभागाचे मंत्री व महाज्योती संस्थेचे संचालक मंडळ यांची संशोधक विद्यार्थीनी बैठक घेऊन एमफिल व पीचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सार्थी संस्थेच्या व बार्टी संस्थेच्या धरतीवर महाज्योती संस्थेअंतर्गत संशोधक फेलोशिप मिळावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

Snehal Joshi .
  • Jan 7 2021 10:42PM
महाज्योती संस्थेअंतर्गत भटक्या विमुक्त, ओबीसी समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे संशोधन क्षेत्रातील शैक्षणिक समस्या सरकारने तात्काळ निकाली काढावे या मागणीसाठी बहुजन समाज कल्याण विभागाचे मंत्री व महाज्योती संस्थेचे संचालक मंडळ यांची संशोधक विद्यार्थीनी बैठक घेऊन एमफिल व पीचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सार्थी संस्थेच्या व बार्टी संस्थेच्या धरतीवर महाज्योती संस्थेअंतर्गत संशोधक फेलोशिप मिळावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. 1} संशोधक विद्यार्थ्यांनी बैठकीत संशोधक फेलोशिप ची मागणी मान्य करावी व जाहिरात काढावी अशी मागणी केली असता तात्काळ जाहिरात काढण्याचे आदेश महाज्योती संस्थेला देण्यात आले आहे. 2} तसेच विमुक्त भटक्या समाजातील एमफिल साठी बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती तात्काळ चालू केली आहे. तसेच इतरही योजना लवकरच मार्गी लावण्यात येतील असे शब्द दिले आहे. ३} एमपीएसी व युपीएसी स्पर्धांकरीता महाज्योती अंतर्गत प्रशिक्षण केंद्र चालु करण्याची मागणी यावेळी मंत्री महोदयांना करण्यात आली व त्यांनी मागणी तत्काळ मान्य केली. ४} महाज्योतीला वार्षिक वित्तीय मदत म्हणुन दरवर्षी २,००० कोटी देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर मंत्र्यांनी महाज्योतीकडुन १,००० कोटी प्रती वर्ष वित्तीय मदत करण्याचा प्रस्ताव राज्यसरकारकडे आले आसल्याचे सांगितले. आजचे निवेदन हे भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे व ओबीसी आघाडी नागपुर शहर अध्यक्ष रमेश चोपडे, संशोधक विद्यार्थी महेंद्र मुंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने यश सातपुते, अमर धरमारे, सन्नी राऊत, बादल राऊत, शेखर कुर्यवंशी, सचिन सावरकर, वैभव चौधरी, करन यादव, आकाश ढवळे, प्रणय तरार, राहुल ठाकुर, अंकीत दास, क्रीतेश दुबे, अशुतोश भगत, राकेश पटले, अभिजीत महाजन, श्रेयांश शाहु, चेतन धार्मिक, वेदांत जोशी, रुषिकेश बढीये, तेजस जोशी, अंकुश राठोड, विठ्ठल नागरे, राम पारखे,विजय धनगर,हरिभाऊ विठोरे, रामेश्र्वर मुळे, बळीराम चव्हाण, गोपाळ तांदळे,सिद्धांर्थ सोनवणे, आदी संशोधक विद्यार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार