नागपुरात निर्बंध शिथिल ! सर्व दुकानांची वेळ सकाळी ७ ते २
नागपूर : बाधित तसेच बळींची संख्या नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून आता अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
नागपूर : बाधित तसेच बळींची संख्या नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून आता अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उद्यापासून नव्या नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार असल्याने अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील, असे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले. शॉपिंग सेंटर, मॉल बंदच राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकांसाठी बंद राहणार असून केवळ होम डिलिवरी करता येणार आहे. शहरात गेल्या काही दिवसांत बाधित तसेच कोरोनाबळींच्या संख्येचा आलेख खाली आला. त्यामुळे विविध दुकानदार असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे दुकाने सुरू करण्यासाठी निवेदन दिली. दरम्यान काल राज्य सरकारने निर्बंध शिथिल करीत दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. राज्य सरकारचे आदेश आज महापालिकेत धडकले. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्बंध शिथिल केल्यासंबंधी आदेश आज सायंकाळी काढले. #आठवडाभर सुरू राहणारी दुकाने
किराणा, औषधी, दूध, भाजीपाला, डेअरी, पॅकेटबंद खाद्य पदार्थांची दुकाने, मटन, चिकन, अंडी, फळे, खते, बी-बियाणे विक्रीची दुकाने.
#सोमवार ते शुक्रवार सुरू राहणारी दुकाने
कपडे, हार्डवेअर, मोबाईल फोन, ज्वेलर्स, इलेक्ट्रिक, सलून, ब्युटी पार्लर, स्टेशनरी, टाईल्स, मार्बल्स, वाहन दुरुस्ती व सुटे भाग विक्री, फेब्रिकेशन, संगणक विक्री, कूलर विक्री.
#हे बंदच
मॉल, शॉपिंग सेंटर, सिनेमागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, उद्याने, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, क्रीडा संकुल, जलतरण.
#पार्सल व होम डिलिवरी
मद्य तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंदच राहणार आहे. परंतु येथून पार्सल तसेच होम डिलिवरीची सुविधा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प