सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापौरांचा आजपासून जनजागृती दौरा

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपूरकरांनी राज्य शासनाव्दारा दिलेल्या दिशा निर्देशांची सर्रास पायमल्ली केली आहे. याचा परिणाम असा झाला कि नागपूरात गेल्या काही दिवसात कोव्हिड - १९ चे रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.

Snehal Joshi
  • Jul 14 2020 11:55PM
मिशन बिगीन अगेन' अंतर्गत लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपूरकरांनी राज्य शासनाव्दारा दिलेल्या दिशा निर्देशांची सर्रास पायमल्ली केली आहे. याचा परिणाम असा झाला कि नागपूरात गेल्या काही दिवसात कोव्हिड - १९ चे रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. बाजारात गर्दी होत आहे. नागरिक नियमांचे पालन करत नाही म्हणून पुन: लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. महापौर श्री संदीप जोशी बाजारातील कोरोनाबाबतची अनियमितता बघता कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याकरीता आजपासून जनजागृती दौरा सुरु करणार आहे. महापौर बाजारात जाऊन कोव्हिड - १९ चे दिशानिर्देशाचे पालन होते किंवा नाही याचा आढावा घेणार आहे. महापौर झोन सभापती यांच्या समवेत १५ जुलै ला दुपारी ४ ते ७ पर्यंत महाल, गांधीबाग बाजाराचा दौरा करतील. ते दि. १६ जुलै ला कमाल चौक, राणी दुर्गावती, पिवळी नदी, जरीपटका, बोरगांव व मानकापूर परिसराचा दौरा दुपारी ३ ते संध्याकाळी ७ पर्यंत करतील. महापौर दि १७ जुलै ला गोकुलपेठ, सदर, सीताबर्डी, गिटटीखदान बाजाराचा दौरा दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत करतील. दि. १८ जुलै ला दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत इतवारी, दहीबाजार, पारडी, डिप्टी सिग्नल, टेलीफोन एक्सचेंज बाजाराचा दौरा करतील. दि. १९ जूलै ला महापौर जगनाडे चौक आणि म्हाळगीनगर परिसरचा दौरा दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत करतील. महापौर २० जुलै ला खामला, धंतोली, गोपालनगर आणि दि २१ जुलै ला सक्करदरा, मानेवाडा, मेडीकल, कॉटन मार्केट आणि रामेश्वरी बाजाराचा दौरा करतील. मनपा निर्देशानुसार दुकाने सुरु करण्यासंदर्भातील काही नियम आहेत. बाजार परिसरातील दुकाने एका बाजूची एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुसऱ्या दिवशी उघडावी, तसे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ हा सकाळी ९ ते सायंकाळी ७ असा आहे. मात्र, हा नियमही पाळला जात नाही. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे, मास्कचा वापर करावा या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकान मालकांची आहे. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चार चाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे. परिणामी आता नागपूर शहरात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार