सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ना. गडकरींच्या प्रयत्नांना यश रेमडीसीविर तयार करण्यास आणखी 7 कंपन्यांमध्ये परवानगी कोरोना रुग्णांना मिळणार दिलासा...

नागपूर, 14 एप्रिल महाराष्ट्र आणि नागपूर येथील कोरोनाची विदारक स्थिती पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेमडीसीविर इंजेवशनचे उत्पादन वाढविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडवीय याना विनंती केली होती.

Sudarshan MH
  • Apr 15 2021 10:19AM


नागपूर, 14 एप्रिल
महाराष्ट्र आणि नागपूर येथील  कोरोनाची विदारक स्थिती पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेमडीसीविर इंजेवशनचे उत्पादन वाढविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडवीय याना विनंती केली होती. ना गडकरी यांची विनंती मान्य करण्यात आली. ना. गडकरी यांच्या प्रयत्नांना यश आले असून रेमडीसीविर या इंजेक्शनची निर्मिती करण्यासाठी आता आणखी 7 कंपन्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडवीय यांची आज गडकरींनी दिल्लीत भेट घेतली. या इंजेवशनचे उत्पादन आता 10 लाख व्हायल प्रतिमाह याप्रमाणे 7 ठिकाणी बनविण्यात येणार आहे.
नागपूर शहर आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाची अत्यंत गंभीर स्थिती आहे. नागपुरात कोरोना रुग्णांसाठी ना. गडकरी यांच्या प्रयत्नातून
आतापर्यंत शहराला 7150 रेमडिसीवीर इंजेक्शन मिळाले आहेत. सात हजार इंजेक्शन आणखी येणार आहेत. 
रेमडेसीवर उत्पादनाचे पेटेंट 4 कंपन्यांकडे आहे. या चार कंपन्या युध्दस्तरावर औषध निर्मिती करीत आहेत. पण आवश्यक तेवढा पुरवठा त्या करू शकत नाही. यासाठी पेटेंटचा कायद्यातील कलम 84 काही काळासाठी शिथिल करण्यासाठ़ी ना.गडकरी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठविले 
 व आज प्रत्यक्ष पंतप्रधानांची भेट घेतली. हा कायदा शिथिल झाला तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे औषध तयार करणार्‍या काही कंपन्यांना हे औषध बनविण्याची परवानगी देता येईल, यासाठ़ी ना. गडकरी यांनी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया यांच्याशीही मंगळवारी संपर्क केला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार