सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंदिरांनी संघटित होऊन प्रभावी भूमिका निभवावी; विहिंप मंदिर आयामाचे आवाहन

नागपूर महानगरातील मोहिते भागातील मंदिर विश्वस्तांची बैठक २३ जूनला जलाराम बाप्पा मंदिर सभागृहात पार पडली.

Shruti Patil
  • Jun 25 2024 10:33AM
नागपूर: मंदिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंदिरांनी संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि यासाठी विश्व हिंदू परिषदेचे मंदिर आयाम जोर करसपणे प्रयत्न करीत आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र संपर्कप्रमुख श्री अनिल सांबरे यांनी यावेळी दिली. नागपूर महानगरातील मोहिते भागातील मंदिर विश्वस्तांची बैठक २३ जूनला जलाराम बाप्पा मंदिर सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

 

ज्या - ज्या ठिकाणी हिंदू समाज कमी झाला त्या त्या ठिकाणी मंदिरांची दुरावस्था झाली, याच्याकडे लक्ष वेधून मंदिरांनी अधिकाधिक समाजाभिमुख होऊन समाजाचे धार्मिक नेतृत्व करावे, असे आवाहन त्यांनी केले. मंदिरांच्या विविध प्रश्नांसाठी विश्वस्तांचे प्रशिक्षण करणे, त्यांच्यासाठी तज्ञांची आधार समिती उपलब्ध करून देणे, या दृष्टीने आयाम प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.

 

नागपूरमध्ये सर्व भागांमध्ये मंदिर विश्वस्तांच्या बैठकी मंदिर आयामाच्या वतीने आयोजित केल्या जात आहेत. आतापर्यंत एकूण ८ बैठकी संपन्न झाल्या. देशभर मंदिरांची व्यवस्थित रचना, संघटन उभे करण्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर एवं अर्चक पुरोहित आयामाच्या वतीने सुरू आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार