सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पेंच गळती दुरुस्तीची स्थायी समिती सभापतीव्दारा पाहणी चार ठिकाणी असलेली गळती दुरुस्ती

नागपूर शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या पेंचच्या २३०० मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर पाच ठिकाणी सुरु असलेली गळती पैकी चार ठिकाणी असलेली गळतीची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तसेच ज्या सात ठिकाणी फ्लो मीटर बसवावयाचे होते त्यापैकी चार ठिकाणी फ्लो मीटर लावण्याचे काम पूर्ण झालेले आहे.

Snehal Joshi .
  • Jan 14 2021 10:38PM
नागपूर शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या पेंचच्या २३०० मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर पाच ठिकाणी सुरु असलेली गळती पैकी चार ठिकाणी असलेली गळतीची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तसेच ज्या सात ठिकाणी फ्लो मीटर बसवावयाचे होते त्यापैकी चार ठिकाणी फ्लो मीटर लावण्याचे काम पूर्ण झालेले आहे. स्थायी समिती व जलप्रदाय समितीचे सभापती श्री. विजय झलके यांनी युध्द स्तरावर सुरु असलेल्या कामाची प्रत्येक्ष पाहणी केली. पेंच पासुन नागपूरला पाणी पुरवठा करण्यासाठी २७ किमीची लांबीची २३०० मी.मी. व्यासाची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. या पाईप लाईन वरुन मोठया प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. गळती दुरुस्त करण्यासाठी नागपूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. श्री. झलके यांनी रोहणा, इटगांव येथे सुरु असलेल्या लिकेज दुरुस्तीची पाहणी केली. तसेच गोरेवाडा बीपीटी, महादुला रॉ वॉटर पपिंग स्टेशनमध्ये फ्लो मीटर बसविण्याचे कामाचे निरिक्षण केले. त्यांनी लवकरात-लवकर सर्व कामे पूर्ण करण्याचे ‍निर्देश दिले. त्यांचासोबत कार्यकारी अभियंता श्री. मनोज गणवीर, उप अभियंता श्री. प्रमोद भस्के होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार