सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोळा, मारबत सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास प्रतिबंध

१९ ऑगस्ट ला साजरा होणारा मारबतीचा कार्यक्रम व मिरवणूक काढण्यावर प्रतिबंध घातला आहे. तसेच नागरिकांनी हा सण घरीच साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Snehal Joshi .
  • Aug 14 2020 8:43PM
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरेक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १८ ऑगस्ट ला साजरा होणारा बैल पोळा व १९ ऑगस्ट ला साजरा करण्यात येणारा तान्हा पोळा सण सार्वजनिक ठिकाणी तसेच सामूहिक स्वरुपात साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच १९ ऑगस्ट ला साजरा होणारा मारबतीचा कार्यक्रम व मिरवणूक काढण्यावर प्रतिबंध घातला आहे. तसेच नागरिकांनी हा सण घरीच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मनपा आयुक्तांनी या संबंधाचे आदेश शुक्रवार (१४ऑगस्ट)ला काढले आहे. नागपूरात बैल पोळा, तान्हा पोळा आणि मारबत मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. दरवर्षी हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. या गर्दीत सामाजिक अंतर ठेवणे अतिशय कठीण असल्याने कोविड-१९ च्या संसर्ग वाढण्याची शक्यता या कार्यक्रमामुळे नाकारता येत नाही. मनपा आयुक्तांनी लोकहिताच्या दृष्टीने व नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचा हितास्तव कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मारबत दहनाचा कार्यक्रम टाळण्याचा आग्रह केला आहे परंतु दहन करणे जर परंपरेनुसार आवश्यक असल्यास तो साजरा करताना पाच पेक्षा जास्त नसतील इतक्या व्यक्तिंच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून व त्रिस्तरिय मास्क घालून मनपा तसेच पोलिस विभागाची पूर्व अनुमती प्राप्त करुन नियमानुसार साजरा करता येईल. आयुक्तांनी नागरिकांना घरीच सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. जर आदेशाचे उल्लंघन झाले तर भादंवि कलम १८८ व अनुषंगीक कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार