सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खबऱ्यांच्या ऐवजी आंतरराज्यीय दारू तस्करांना आशीर्वाद? नंदुरबार उत्पादन शुल्क विभागासह पोलीस विभागावरही प्रश्नचिन्ह

नंदुरबार- विसरवाडी पोलिसांनी गेल्या आठवडयात 18 लाखाचा मद्यसाठा नंदुरबारचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून जप्त केला.

Nandurbar MH
  • Jun 29 2021 4:50PM

नंदुरबार- विसरवाडी पोलिसांनी  गेल्या आठवडयात 18 लाखाचा मद्यसाठा नंदुरबारचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून जप्त केला. ही कारवाई अभिनंदनीय असली तरी पुढील तपासाचे काय ? तसेच नंदुरबारचा अबकारी विभाग निष्क्रीय आहे की भ्रष्ट? दारू तस्करांना ऊघड करणारे खबरे कशामुळे निष्क्रिय होत आहेत? सिमावर्ती भागात तस्करांचे स्तोम माजवणारे अधिकारी कोण? असे अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत.
     या दोन्ही विभागांच्या आशीर्वादाने दररोज लाखो रुपयांचा बनावट मद्यसाठा गुजरात राज्यात पाठविला जातो. दररोज बनावट मद्याच्या अवैध वाहतुकीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर दारुची उलाढाल होते. बनावट दारुबाबत कारवाई करण्याचे अधिकार आपल्याला नाहित, असे सांगून पोलीस विभाग सोयीस्करपणे जबाबदारी झटकून पळवाट काढत असतो. खास करून गुजरात राज्यात दारुबंदी असल्याने तेथे छुप्या मार्गाने मोठया प्रमाणावर दारुची वाहतूक केली जाते. मध्यप्रदेशात बनावट दारुचे  अनेक कारखाने आहेत. कमी दराची ही दारु मोठया नामांकीत  कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये टाकून त्याची विक्री केली जाते. ही दारु मध्यप्रदेशातून महाराष्ट्रमार्गे गुजरात राज्यात पाठविली जाते. सदर दारु कुठून कशी वाहतूक होते याबाबतची संपुर्ण माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस विभागालाही आहे. मध्यप्रदेशातील दारु आधी  नवापूर येथे येते दररोज दारुच्या ट्रका उभ्या राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . या ट्रकांमधील दारु क्वालीस, स्कॉर्पिओ, इनोव्हा अशा आलिशान गाडयांमधून रवाना केली जाते . हा सारा प्रकार पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अर्थपूर्ण संबंधाशिवाय शक्यच नाही . त्यामुळे स्थानिक विभाग तसेच पोलीसांमार्फत कुठलीही कारवाई केली जात नसावी, यावर उघडपणे चर्चा चालतात.
खबऱ्यांनी पोलिसांना गुप्तवार्ता देणे बंद केले आहे का? अवैध वाहतुकीची माहिती स्थानिक पोलिसांना मिळत नाही का? यावरही गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. कारण तसे पहाता या अवैध व्यवसायाचा भांडाफोड खबऱ्यांच्या माहितीवरुन यशस्वी होत असतात . मात्र, दीड वर्षात या विभागाने एकही मोठी कारवाई केलेली नाही. याचा अर्थ खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन या विभागाने कारवाई केलेलीच नसावी. त्यामुळेच खबऱ्यांचाही या पथकावर आता विश्वास राहिला नसावा आणि त्याच कारणास्तव नवापूरचे हत्या प्रकरण घडले असावे, असा कयास सुरत हायवे वरील काळे धंदे चालवणाऱ्यांच्या वर्तुळात लावला जात आहे. दारूबंदी विभाग व पोलिस विभागातील दारू तस्करांचे समर्थक असलेल्या भ्रष्टांनी दारू तस्करा करवी खून करूवून घेतला का ? अशीही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
 मुळात अवैध व्यवसायांचे मुख्य सूत्रधार हे गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातील आहेत. त्या सिमेलगतच्या ५ जिल्ह्यातून ही वाहतूक व तस्करी होते. या तस्करीची सर्व माहिती गाड्या नंबरसह स्थानिक पोलिसांना असल्याचे बोलले जाते. पण कारवाई करण्याऐवजी त्या गाड्या योग्यस्थळी सुखरूप कशा पोहोचतील? या काळजीत स्थानिक पोलिस असल्याने अवैध व्यवसाय दिवसेंदिवस जिल्ह्यात फोफावत आहे, असे या व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे बनावट दारुबाबत कारवाई करण्याचे अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे, असे सांगून पोलीस विभाग आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत असतो. दोन्ही विभागाशी असलेल्या "अर्थपूर्ण" संबंधामुळे बनावट मद्यवाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. याबाबत आता दोन्ही विभागांनी सक्रीय झाले तरच बनावट दारुची तस्करी रोखण्यात मदत होणार आहे. अन्यथा दोन्ही विभागांची अशाचप्रकारे टोलवाटोलवी होत राहिल आणि तस्करांची चांदी होत राहील, असे दिसते.
  अर्थात हे अर्थपूर्ण कारभार आणि चांदी करणाऱ्या तस्करांचे जाळे फक्त बनावट दारु तस्करी पुरता मर्यादित नाही. याची व्याप्ती खूप मोठी आहे.
नंदुरबार जिल्हा हा दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला असल्याने तसेच दोन महामार्ग जिल्हयातून जात असल्याने येथून दररोज बनावट दारुसह , रेशन , रसायने , गॅस, लाकूड, गोमांस, गोवंश, रेशनिंग या सगळ्याची तस्करी चालते. सीमावर्ती भागात चालणारे जुगाराचे मोठाले पत्त्याचे क्लब, नवापूर शहरात व तालूक्यात जोमाने फोफावलेला सट्टा मटका, त्याचा खूले आम चालणारा बाजार, त्याचप्रमाणे विमल गुटखा तस्करी, रेती तस्करी हेही बिनदिक्कत चालते. रस्त्याने ट्रिपल सीट जाणाऱ्या किंवा मास्क न लावणाऱ्या गरिबांना तसेच गाडी लायसन नसलेल्यांना जागेवरच कायदा दाखवून दंड ठोकण्याची धमक दाखवणारे पोलीस हा सर्वव काळाबाजार थांबवण्याची धमक दाखवतील काय हा प्रश्न जनतेकडून केलाा जात आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार