सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भालेरच्या खुनातील मयत पश्चिम बंगालचा शिताफीने तपास करून तिघांना केली अटक

नंदुरबार- कुठलाही धागा हाती नसतांनाही अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने भालेर येथे अनोळखी युवकाचा डोक्यात वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

Nandurbar MH
  • Jul 1 2021 3:38PM

नंदुरबार- कुठलाही धागा हाती नसतांनाही अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने भालेर येथे अनोळखी युवकाचा डोक्यात वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. मयत व्यक्ती पश्चिम बंगालचा रहिवासी असून तो नंदुरबारला खरोखर कोणत्या कामासाठी आला होता आणि त्याचा येथील तरुणांनी खून करण्याचे कारण काय? हे सर्व गुढ उकलण्यात यश मिळाल्याचा दावा अतिरिक्त अधीक्षक विजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
आज गुरुवार दिनांक 1 जुलै 2021 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. त्याप्रसंगी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक रविंद्र कळमकर आणि अन्य उपस्थित होते. अतिरिक्त अधीक्षक विजय पवार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दिनांक २६ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे शासकिय आश्रमशाळेच्या बाजुला असलेल्या शेताच्या बांधालगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरीकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत कळविल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून शेतात पडलेल्या मृतदेहाची पाहणी केली. तसेच गुन्हा उघडकिस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. हाफ पँट घातलेला एक अनोळखी पुरुष रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेला होता. तसेच मृत व्यक्तीच्या अंगावर, डोक्यावर मारहाण केल्याच्या व जखमेच्या खुणा होत्या. याबाबत नगांव गावाचे पोलीस पाटील प्रशांत सुकलाल मगरे यांचे फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. 
घटनास्थळावर मयताची ओळख पटु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, सी. सी.टी.वी. प्रतक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती. तसेच गुन्हा रात्रीच्या अंधारात घडला असल्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे व मयताची ओळख पटविण्याचे तसेच जिवेठार मारण्याचा उद्देश तपासून करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ५-५ अमलदारांचे ६ पथक तयार करण्यात आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने घटनास्थळापासून जवळ असलेल्या रेल्वे ट्रैक पर्यंत पायी शोध मोहिम केली. दुसऱ्या पथकाने भालेर ते नंदुरबार रेल्वे स्टेशन पर्यंत पायी शोध घेतला. एक पथक घटनास्थळाच्या आजू-बाजूला असलेल्या सर्व गावांमध्ये मयताचा व त्याच्या हातावर गाेंधलेल्याचा फोटो दाखवून तपास करीत होते. तर एक पथक नंदुरबार रेल्वे स्थानकावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करीत होते. दोन दिवस ऊलटूनही ओळख पटली नाही. 
 या तपासादरम्यान एका पथकाला माहिती मिळाली की एक इसम प्रवासात रेल्वेतून निघून गेला असलेबाबत माहिती देण्यासाठी दिनांक २५ जून २०२१ रोजी नंदुरबार रेल्वे पोलीस ठाण्यात ४ जण आले होते. त्यावरून अधिक माहिती घेतली असता हावडा प. बंगाल येथील ५ इसम मरुच गुजरात राज्य येथे मजुरी करण्यासाठी जात असतांना त्यातील एक तरुण नंदुरबार रेल्वे स्थानकावर उतरून गेला अशी त्रोटक माहिती मिळाली.
त्यावरून पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अमलदार असे भरुव गुजरात येथे रवाना झाले. भरुच येथे त्या ४ अनोळखी व्यक्तीचा शोध घेवून त्यांना मयताचा फोटो व त्याच्या हातावर गोंदलेले दाखविले. त्यांनी मयतास ओळखून मयताचे नाव दिपक सुकरा उराव वय २६ रा. शिमन लेन, मथुरा, बागान, मथुरा टी गार्डन ता. जि. अलिपुरदुआर जलपैगुडी पश्चिम बंगाल असे सांगितले. मयताची ओळख पटविण्याबाबतचा पहिला टप्पा पार करण्यात पथकाला यश आले होते,
परंतु सदर मयत इसमाचे मारेकरी कोण ? त्यास का मारण्यात आले? मारण्याचा उद्देश काय? असे मोठे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे होतेच. त्यामुळे मयताच्या चारही मित्रांना भरुच गुजरात येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार येथे आणले व त्यांच्याकडे सखोल विचारणा करुनही गुन्ह्याबाबत व आरोपीतांबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती.
गुन्हा घडून ४ दिवस झाले होते तरी पथकांना यश येत नव्हते. दिनांक ३० जून २०२१ रोजी एका गुप्त बातमीदाराने बातमी मिळाली की, दिनांक २५/०६/२०२१ रोजी रात्रीच्या सुमारास भालेर येथील नविन वस्तीगृहाचे सुरु असलेल्या बांधकामाजवळील रस्त्यावर मिक्या रा. भालेर ता.जि. नंदुरबार व त्यासोबत २ इसम एका तरुणाला मारहाण करीत होते. त्यावरुन भालेर गावात मिक्या नावाच्या व्यक्तीची माहिती काढून शोध घेवून त्यास शेतातुन ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव भिका गेंदल पाटील वय-२६ रा. भालेर ता.जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास घडलेल्या घटनेबाबत विचारपुस केली असता सुरुवातीस उडवा उडवीची उत्तर देवू लागल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने सांगीतले की, दिनांक २५/०६/२०२१ रोजी रात्री ०९.०० ते ०९.३० वा. दरम्यान तो तसेच प्रकाश हिरामण पाटील व मुकेश गंदल पाटील असे मोटार सायकलने नंदुरबारकडे जात असताना रस्त्यात एका अनोळखी तरुणाने त्यांना भालेर गावाचे प्राथमीक आरोग्य केंद्राचेपुढे शिवीगाळ करून प्लॅस्टीकच्या पाईपने मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांच्यात वाद विवाद होवून त्या तिघांनी अनोळखी तरुणास लाकडी काठी, दगड हाता बुक्क्यांनी मारहाण केली त्यास अनोळखी इसमाने देखील प्रतिकार केला व तिन्ही आरोपीतांच्या ताब्यातुन तो इसम पळुन तेथुन वस्तीगृहाचे बाजुला असलेल्या शेताकडे गेला. त्यानंतर तिघांनी त्याचा पाठलाग करुन त्यास वस्तीगृहाच्या बाजूला असलेल्या शेतात पकडले व तेथे पुन्हा मारहाण करून डोक्यात लाकडी काठी मारुन गळा आवळला. त्यामुळे अनोळखी इसम मयत झाला. त्यानंतर मुकेश गंदल पाटील वय ३६ रा. भालेर ता. जि. नंदुरबार व प्रकाश हिरामण पाटील वय रा. मालेर ता.जि. नंदुरबार असे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शिताफीने ताब्यात घेवून त्यांनी देखील सुरुवातील उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांना देखील विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे उघड झाले.
कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसतांना क्लिष्ठ अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार, मा. उप-विभागीय पोलीस अधीकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तात्पुरते प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व संपुर्ण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सर्व अमंलदारांनी केली आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार