सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केवळ खानापूर्तीसाठी पोलीस घेतात गोरक्षकांच्या कागदोपत्री बैठका; बहिष्कार टाकून गोरक्षकांंनी घेतला आंदोलनाचाा पवित्रा

नंदुरबार- जिल्ह्यात गोहत्येचा प्रश्न आणि गोवंश तस्करीचा मुद्दा ज्वलंत असतानाही त्याविषयी कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने कानाडोळा केला जात असल्याचे नेहमी पाहायला मिळते.

Nandurbar MH
  • Jul 15 2021 10:59AM

नंदुरबार- जिल्ह्यात गोहत्येचा प्रश्न आणि गोवंश तस्करीचा मुद्दा ज्वलंत असतानाही त्याविषयी कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने कानाडोळा केला जात असल्याचे नेहमी पाहायला मिळते. पण दरवेळी ईदच्या पार्श्वभूमीवर गोरक्षकांच्या बैठका आयोजित करणे देखील पोलीस दलाने केवळ एक खानापूर्तीचा भाग बनवून टाकला असून त्याची निष्पन्नता शुन्य आहे. या संतापजनक उदासिनतेचा निषेध म्हणून आता गोरक्षकांनी पोलीस दलाच्या बैठकांवर बहिष्कार घालत तीव्र आंदोलन छेडण्याचा भूमिका घेतली आहे.
    या विषयाची पार्श्वभूमी अशी की गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यावर नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन अद्याप पर्यंत कठोर अंमलबजावणी करू शकलेला नाही जिल्हा प्रशासनाने देखील त्यावर तत्पर भूमिका घेतलेले नाही. परिणामी नंदुरबार जिल्ह्यातील गोरक्षकांमधे संतप्त भावना आहेत. समस्त गोरक्षकांनी प्रशासनापुढे याविषयी वारंवार भूमिका मांडली आहे. गोरक्षकांच्या म्हणण्यानुसार  नंदुरबार जिल्हा गेल्या अनेक वर्षांपासून गौतस्करी आणि गोवंश कत्तली विषयी कुप्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या सीमेलगत गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून वाहनाद्वारे आणि नर्मदा नदीतूनही  मोठया प्रमाणात अवैध गौतस्करी चालते. गौतस्कर  कत्तलीसाठी गोवंशाची नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह मालेगाव, मुंबई येथे वाहतूक करतात. या अवैध गोवंश वाहतुकी विरोधात आवाज उठवतात त्यावेळी प्रशासन तात्पुरता स्वरूपाची कारवाई करते पण कायमस्वरूपी पायबंद घालत नाही. प्रशासना कडून कारवाई होत नसल्यानेच गौरक्षक स्वतःच्या जीव धोक्यात घालून गोवंश वाचविण्याचा प्रयत्न करत असतात. 
असे सगळे वास्तव समोर असताना फक्त ईद कालावधीमध्ये गोरक्षकांची बैठक घेण्याचा फार्स केला जातो. पोलीस प्रशासन गो रक्षकांचे म्हणणे गांभीर्याने जाणून घेण्यासाठी बैठका आयोजित करतच नाही. त्याउलट फक्त खानापूर्तिचा भाग म्हणून केवळ शासकीय रकाने भरण्यासाठी कागदोपत्री बैठका बोलावल्या जातात. या देखाव्याचा अनुभव दोन दिवसांपूर्वी सर्व गोरक्षकांनी घेतला. पोलीस विभागाने बैठक बोलावली परंतु ठोस कारवाईच्या दृष्टीने कोणतीही निष्पन्नता निघाली नाही. यावरून गोरक्षकांमध्ये आता कमालीची संतप्त भावना आहे. यापुढे पोलीस विभागाच्या अशा बैठकांवर आणि चर्चांवर बहिष्कार घालण्याची भूमिका समस्त गोरक्ष त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. ईद कालावधीत होणारी गोवंश हत्या थांबवावी,  चाललेली गोवंशाची वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अवैध गोवंश वाहतूक व कत्तल थांबविण्यासाठी जिल्हाभरात कायमस्वरूपी चेकपोस्ट निर्माण करण्यात यावे. गोवंश हत्याबंदी पथक निर्माण करून त्यावर जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (उपविभागीय पोलीस अधिकारी) नेमणूक करावी व प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अशी पथके कायमस्वरूपी निर्माण करून स्थानिक पोलीस अधिकारी नेमणूक करावी, या मागण्या पुन्हा मांडल्या आहेत. तसेच गोरक्षकांनी केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास  तीव्र आंदोलन छेडण्याचा गोरक्षकांनी दिला आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार