सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना शहीद आरोग्य कर्मचार्‍यास 50 लाखाचा विमा मंजूर

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना शहिद स्व.राजेंद्र माळी यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळाला असून 50 लाख रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत

Nandurbar MH
  • Aug 3 2021 12:10PM

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना शहिद स्व.राजेंद्र माळी यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळाला असून 50 लाख रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभयसिंग चित्ते यांनी दिली.
कोविड काळात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोनाला हद्दपार  करण्यासाठी जीवाची बाजी लावली आहे. त्यातच कोरोना कामे करीत असतांना प्रा.आ.केंद्र खापर मधील कोराई उपकेंद्राचे आरोग्य सेवक राजेंद्र सुकलाल माळी यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनामुळे आरोग्य कर्मचारी दगावल्याची नंदुरबार जिल्ह्यातील ही पहिलीच घटना होती. शासनाने कोरोना योध्दांसाठी पंतप्रधान विमा सुरक्षा कवच योजना सुरु केली.  यासाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व कागदपत्र एकत्र करुन प्रस्ताव सादर केला. यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे यांनी तातडीने निर्णय घेवून पुढील मंजूरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून स्व.माळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर 50 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते विम्याचे कागदपत्र माळी कुटूबियांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते, भूपेंद्रकुमार चौधरी, रियाज सैय्यद, सागर शर्मा, संजय राजपूत उपस्थित होते.  
विमा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. विमाप्रस्ताव तयार करण्यासाठी संघटनेने परिश्रम घेतल्याने माळी कुटूंबियांनी जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले आहेत. संघटनेच्या वतीने आतापावेतो दोन कुटूबांना विम्याचा लाभ मिळवून दिल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते यांनी व्यक्त केली आहे. स्व.माळी यांच्या वारसांना प्राधान्याने अनुकंपा तत्वावर शासकिय सेवेत सामावून घ्यावे अशी आग्रही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार