सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबा: कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या कुटूंबियांना मिळाली ५० लाख रुपयांची मदत

नंदुरबार - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या येथील पोलिसांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांची मदत प्राप्त झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक महेश महेंद्र पंडित यांच्या हस्ते मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.

Nandurbar MH
  • Jun 9 2021 10:21AM

नंदुरबार - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या येथील पोलिसांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांची मदत प्राप्त झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक महेश महेंद्र पंडित यांच्या हस्ते मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.
         जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले चालक सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मानसिंग बबनसिंग गिरासे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचेवर केशरानंद हॉस्पिटल, धुळे येथे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी त्यांचा दुदैवी मृत्यू झाला होता. तसेच पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे कार्यरत असलेले पोहेकॉ शशिकांत सत्यपाल नाईक यांची दिनांक २७ मार्च २०२१ रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे दाखल केले असता त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट कोरोना पॉझिटीव्ह आली होती. अशा प्रकारे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मानसिंग बबनसिंग गिरासे व पोहेकॉ. शशिकांत सत्यपाल नाईक यांचा कोरोनाशी लढतांना मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस महासंचालक यांना पाठविला होता. सदर प्रस्तावावर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर तो संबंधित विभागाकडे पाठविण्यांत आला होता. प्रस्ताव मंजूर झाल्याने वरील दोन्ही कोरोना योद्धा पोलीस अंमलदारांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान मदतीचा धनादेश दि.०८ जून २०२१ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांच्या हस्ते मानसिंग गिरासे यांची पत्नी श्रीमती आशाबाई मानसिंग गिरासे, मुलगा विजय मानसिंग गिरासे यांना तसेच शशिकांत नाईक यांची पत्नी श्रीमती कल्पना शशिकांत नाईक, मुलगा डॅनियल शशिकांत नाईक व शाल्मन शशिकांत नाईक यांना प्रदान करण्यांत आला. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, पोलीस उप अधीक्षक (गृह) श्री. डी. एस. गवळी, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी श्यामकांत पाटील असे हजर होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार