सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सर्व बंधने झुगारून छत्रपती शिवाजी महाराज यांची संबंध जिल्ह्यात 21 मार्च रोजी तिथीनुसार जयंती साजरी झालीच पाहिजे

नंदुरबार - हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 21 मार्च रोजी तिथीनुसार जयंती असून समस्त हिंदू संघटनांनी एकत्रीतपणे भव्य आयोजन करावे आणि त्यासाठी एकत्रित बैठका घ्याव्यात

Nandurbar MH
  • Mar 9 2022 11:20AM

नंदुरबार - हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 21 मार्च रोजी तिथीनुसार जयंती असून समस्त हिंदू संघटनांनी एकत्रीतपणे भव्य आयोजन करावे आणि त्यासाठी एकत्रित बैठका घ्याव्यात, ही समस्त हिंदू प्रेमींच्यावतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

समस्त हिंदूंना परमश्रध्देय असलेले हिंदू स्वराज्याचे पहिले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 21 मार्च रोजी तिथीनुसार जयंती असून समस्त हिंदू संघटनांनी दहा दिशेला दहा तोंड न ठेवता एकत्र यावे आणि ही शिवजयंती दणकेबाज साजरी करून आपले एकत्रित अस्तित्व दाखवावे, ही सर्व हिंदू प्रेमी नागरिकांना अपेक्षित आहे. परंतु छत्रपतींच्या नावाने सर्व काही मिळवून घेणारे बरेच मावळे 21 मार्च रोजी शिवजयंतीला विविध कायदेशीर अडचणी दाखवत प्रशासनाच्या दबावात मुकाटपणे आपापल्या स्तरावर शिवनमन करतील व षंढपणा जोपासतील असे दिसत आहे. कारण शिवजयंतीला एकत्र येणार का, असा कानोसा विविध संघटनाकडे घेतला असता शिवरायांची सळसळती चेतना दिसण्याऐवजी त्यांच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा धाकच जास्त दिसून आला. अजूनही ते एकत्रित बैठका घ्यायला तयार नाही. शिवजयंतीीी साजरी करण्याचे नियोजन अद्याप तयार केलेले नाही. ही विदारक व शर्मिंदा करायलाा लावणारी गोष्ट आहे.

कधी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून तर कधी कोरोना कालावधी आहे म्हणून शिवजयंती साजरी करण्यावर नेहमी संक्रांत येते. मधल्या काळात अनेक संघटनांचे हजारोंच्या उपस्थितीत कार्यक्रम झाले, मोर्चे निघाले, DJ वाजले, रॅली निघाल्या मग फक्त शिवजयंती प्रसंगी शिवप्रेमीच का अडचणीत आणले जातात? ही स्थिती बदलायची असेल तर संघटित होणे आवश्यक आहे. शिवजयंती निमित्त हे लक्षात घ्यायला हवे. मान्य आहे की शिवप्रेमींना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते आणि त्याचीच भीती मनात बसली आहे.
याला मागील क्रमाने घडलेल्या अनेक अनुचित घटनांचे संदर्भ आहेत. जसे की, शिवजयंतीला मोठ्या मिरवणुका काढायचा नाही, मोठे डीजे लावायचे नाही, असे बंधन आधीच लादले जाते. एक प्रकारेे प्रशासन  उत्साह व्यक्त करण्याचा संघटनांचा हक्क आणि मार्ग आधीच संपवून टाकते. शिव जयंती रॅली असो, शिव जयंतीनिमित्त लावलेले अफजलवधाचे बेनर असो अथवा नगरपालिका संकुलात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे असो यावरून अनेक केसेस झाल्या आहेत. अनेक शिवप्रेमींना हद्दपार तडीपार आरोपीमधे रुपांतरीत करायला तिथूनच वेग आला. जणू छत्रपती शिवरायांवरील प्रेम व्यक्त करणे म्हणजे सजा मिळण्यास पात्र ठरणे, हे शासन दरबारी सूत्र ठरले आहे. यामुळे जनता संभ्रमात आहे की, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत नेमके कोण ? छत्रपती शिवराय की क्रुरकर्मा अफजल खान ? आज परिणाम असा की, अनेक नवे हिंदू तरूण केसेस दाखल व्हायला व पोलिसांचे लक्ष्य बनायला घाबरत आहे. मग, आता मोघलशासकांच्या भुमिकेत वावरणाऱ्या अधिकाऱ्यांची दहशत मानून आपण शिवप्रेमींनी एकत्रित येऊन संघटितपणे मोठ्या स्वरूपात शिवजयंती मनवायचीच नाही का? शासनाने घोषित न केलेली परंतु कृतीत आणलेली ही असली अप्रत्यक्ष बंदी लादून घेणार का ? हा आमचा सर्व हिंदू संघटनांना जाहीर सवाल आहे. छत्रपती शिवरायांच्या भोवती दहशत माजवणारे अफजल खान शाहिस्तेखान आणि औरंगजेब असे अनेक शासक होते. शासनाची कारवाई होईल या भितीने महाराजांनी संघटन केलेच नसते तर, आज तुम्ही सुंता करून फिरले असता; हे आपण सर्वांनी लक्षात घेणेे आवश्यक आहे. साधी शिवजयंती साजरी करायला सुद्धा आपण एकत्रित यायला धजावत नसाल तर आपण शिवप्रेमी म्हणून घेण्याच्या लायकीचे राहिलेलो नाही हे तरी जाहीर मान्य करावे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार