सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्ह्यासाठी 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र प्राप्त

नंदुरबार दि.8- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या पुणे कोविड प्रतिसाद शाखेतर्फे जिल्ह्यासाठी 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र आणि 5 बायपॅप यंत्र जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत.

Nandurbar MH
  • May 9 2021 12:08PM


नंदुरबार दि.8- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या पुणे कोविड प्रतिसाद शाखेतर्फे जिल्ह्यासाठी 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र आणि 5 बायपॅप यंत्र जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चर ही संघटना कोविड संकटाशी सामना करण्यात शासनाच्या प्रयत्नांना साथ देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्याला ही यंत्रे देण्यात आली आहेत. शनिवारी सकाळी पुण्याहून ही यंत्रे जिल्हा रुग्णालयात पोहोचली. यंत्रात रुग्णाची ऑक्सिजन पातळी मोजून त्यानुसार ऑक्सिजनचे प्रमाण निर्धारीत करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यंत्राची पाहणी केली. त्यांनी या सहकार्याबद्दल मराठा चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. या यंत्रांचा उपयोग तळोदा, अक्कलकुवा, धडगाव सारख्या भागासाठी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे, डॉ. किरण वानखेडे, डॉ. किरण जगदेव, औषध निर्माण अधिकारी वामन बोरसे आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार