सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यात तापीची पातळी वाढली; मुसळधार पावसाने दोन मृत्यू

नंदुरबार - मुसळधार पाऊस पडत असल्याने तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटरस्ता दरड कोसळून बंद पडला.

Nandurbar MH
  • Sep 8 2021 6:21PM

नंदुरबार -  मुसळधार पाऊस पडत असल्याने तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटरस्ता दरड कोसळून बंद पडला. यामुळे अडकलेल्या रुग्णवाहिकेतील महिला रुग्ण दगावल्याची तसेच नाल्याच्या पुरात एकजण वाहून गेल्याची दुर्घटना घडली.
      अधिक वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील पहिला सलग मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी-नाल्यांना प्रथमच पूर आला आहे. प्रथमच चांगला पाऊस पडत असला तरी शेतकऱ्यांना आधीच पावसाअभावी फटका बसला होता आता सतत धार चालू असल्यामुळे पुन्हा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तापी नदीच्या पात्रात जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने तापी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून पुराची पातळी वाढली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असून दुपारी 3 वाजता  हतनूर धरणाचे 41 दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडल्याने तापी नदीपात्रात  76 हजार 993 क्युसेक विसर्ग  सोडण्यात  आला आहे. तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सुलवाडे प्रकल्पाचे 12  दरवाजे 3 मीटर उघडल्याने तापी नदीपात्रात 91 हजार 665 क्युसेक्स विसर्ग होत आहे. पुढील 72 तासात हतनूर आणि सुलवाडे प्रकल्पातून तापी नदीपात्रात  मोठा विसर्ग  सोडण्याची शक्यता आहे. तसेच बॅरेजच्या बाजूतील मुक्त पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन प्रकल्पाच्या तसेच नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
पाणीसाठा आणि विसर्गामुळे पुरस्थिती उद्भवू नये व सुरक्षिततेच्यादृष्टीने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे 7 दरवाजे पूर्णपणे उघडून 1 लाख 37 हजार 321 क्युसेक्स  व  प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 11 दरवाजे पूर्णपणे उघडून 1 लाख 41 हजार 961 क्युसेक्स  इतका विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. 

 तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
     दरम्यान मांडवी येथे एक तरुण पुरात वाहून गेला. प्राप्त माहितीनुसार मानवानी येथील एक युवक मांडवी येथे सासुर वाडीला आला होता. ओढ्यास आलेला पूर इतरांसोबत पाहण्यास गेला असता त्याचा पाय घसरला आणि 50 फूट खाली पाण्यात पडला व पुरात वाहून गेला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. 
     त्याच वेळी तळोदा तालुक्यात अक्राणी मार्गांवरील चांदसैली घाटामध्ये पहाटेच्या सुमारास 100 मीटर भागात   दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे धडगावकडून तळोदाकडे येणारी रुग्णवाहिका घाटात अडकली. या रुग्णवाहिकेतील एका महिला रुग्णाचा उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने मृत्यू झाला. याबाबत अधिकृत नोंद होण्याचे काम चालू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांकडून ती दरड काढण्याचे काम सुरु आहे. रात्रीपर्यंत दरड हटविण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले आहे. प्रत्येक पावसाळ्यात या दुर्गम भागातून वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होतो तसेच रस्तेे खचण्याच्या घटना घडतात म्हणून लोक संतप्त झाले आहेत. रस्त्या अभावी उपचार न घेऊ शकलेली महिला ज्या अक्राणी तालुक्यातील आहे तो आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या विधानसभााा मतदारसंघातील भाग आहे. पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार