सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बेदरकार गुजराती ठीयावाल्यांनी वाढवले रेतीचे भाव

नंदुरबार - एकीकडे तापी मातेच्या रेती विक्रीपासून महाराष्ट्रीयन भूमिपुत्रांनाच वंचित ठेवण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने अवलंबले आहे व त्यामुळे महाराष्ट्रातील व्यवसायिकांना फक्त रेती वाहतुकीवर भागवावे लागत आहे.

Nandurbar MH
  • Jun 29 2021 9:43PM

*गुजराती ठिय्यावाल्यांच्या विरोधात वाळू वाहतूकदार वाहन संघटनेने फुंकले शंख*
नंदुरबार - एकीकडे तापी मातेच्या रेती विक्रीपासून महाराष्ट्रीयन भूमिपुत्रांनाच वंचित ठेवण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने अवलंबले आहे व त्यामुळे महाराष्ट्रातील व्यवसायिकांना फक्त रेती वाहतुकीवर भागवावे लागत आहे. तर दुसरीकडे गुजराती व्यापाऱ्यांनी भाव वाढ करीत महाराष्ट्रातील रेती वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी म्हणून आता वाळू वाहतूकदार संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र सरकारने मागील पाच सहा वर्षांपासून तापी काठावरील वाळू उपशाचे ठेके बंद केले आहेत त्यामुळे तापी नदीकाठावर महाराष्ट्र हद्दीत वाळू उपसणे कायदेशीर बंद करण्यात आले आहे. लाखो रुपयांचा दंड भरावा लागत असल्यामुळे अनेक जणांनी वाळू उपसण्याचा ऐवजी वाळू वाहतुकीमध्ये पर्याय शोधला. गुजरात हद्दीतील तापी काठावरून मात्र प्रचंड प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. गुजरात सरकारने पूर्ण मुभा दिली असल्यामुळे गुजराती ठेकेदार दिवस-रात्र उपसा करत असतात. शिवाय महाराष्ट्रात परराज्य वाळू पुरवठ्याला महाराष्ट्र सरकारनेच मान्यता देऊन ठेवली आहे. घरातली उपाशी आणि परकिला लुगडं; अशा प्रकाराच्या या धोरणामुळे महाराष्ट्रीयन वाळू ठेकेदारांवर मोठा अन्याय झाला आहे. 
    एकीकडे असे असताना दुसरीकडे गुजरात मधील वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारांनी महाराष्ट्रीयन वाहतूकदारांची प्रचंड अडवणूक करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यांनी रेतीचे अव्वाच्या सव्वा भाव आकारणे सुरू केले आहे. गुजरातच्या ठेकेदारांनी अव्वाच्या सव्वा वाढवलेल्या दराचा फटका अखेरीस सामान्य जनतेसच सोसावा लागत आहे. ज्या दराने लिलाव घेतला त्याच्या सात ते आठ पट नफा काढणे त्यांनी सुरु केले आहे. परिणामी सतत 8 दिवसापासून रेती बंद असल्याने सरकारी व निमसरकारी तसेच अनेक खाजगी बांधकामे 100% बंद पडले आहेत. 
     शिवाय गाडीचालकांची अडवणूक केल्याने डम्पर चालक मालक बरोबरच हातावर पोट भरणारे क्लिनर, चालक  यांच्यावर संक्रांत आली आहे. गुजरात मधील ही सर्व वाळूू वाहतूक प्रामुख्याने नंदुरबार नजीकच्या निझर आणि वाका चाररस्ता मार्गे नंदुरबारला येऊन पुढे महाराष्ट्रभरातील धुळे नासिक पुणे मुंबई प्रमाणेच बीड अकोला बुलढाणा सोलापूर कोल्हापर अशा विविध शहरात आणि जिल्ह्यात ही वाळू वाहिली जात असते. यात नंदुरबारमधील किमान 200 डंपर धावत असतात. या डंपर धारकांना जेमतेम पंधराशे रुपयांपर्यंत कमाई मिळते. त्यातून चालक क्लिनर यांचे पगार, गाडीचाा मेंटेनन्स, बँकेचे आणि अन्य हप्ते इतका खर्च त्यातूनच भागवायचा असतो. गुजरातच्याा ठेकेदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आज त्यावर पाणी फिरले आहे. म्हणूनच गुजराती ठिय्यावाल्यांच्या विरोधात वाळू वाहतूकदार वाहन संघटनेने आता शंख फुंकले आहेत. भाव कमी न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. नर्मदा आणि तापी नदी काठावरून वाळू उपसा च्या माध्यमातून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा कर गुजरात सरकारच्या घशात घालण्याचा आणि नंदुरबारच्या भूमिपुत्रांना उपाशी ठेवण्याचा उफराटा कारभार महाराष्ट्र सरकार बंद करणार की नाही? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार