सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबार: म्युकरमायकोसिससाठी विनाविलंब स्वतंत्र रुग्णालय उभारा; खासदार डॉक्टर हिना गावित यांची मागणी*

नंदुरबार - ब्लॅक फंगसची वाढती रुग्णसंख्या पाहता विनाविलंब डेडिकेटेड म्युकरमायकोसिस हॉस्पिटल ऊभारून तत्काळ उपाय योजना कराव्या,

Nandurbar MH
  • May 22 2021 10:38AM

 नंदुरबार - ब्लॅक फंगसची वाढती रुग्णसंख्या पाहता विनाविलंब डेडिकेटेड म्युकरमायकोसिस हॉस्पिटल ऊभारून तत्काळ उपाय योजना कराव्या, अशी मागणी राज्य शासनाकडे खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी केली आहे.
याविषयी पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, 
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील वाढती कोरोना परिस्थिती लक्षात घेता सद्या कोरोना सोबतच कोरोनामुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिस या जीवघेण्या फंगल इंफेक्शनचा धोका वाढत आहे. या ब्लॅक फंगसच्या संसर्गाचा परिणाम नाक, डोळे, मेंदूत व त्वचेवर दिसून येतो. या ब्लॅक फंगसमुळे रुग्ण त्यांची दृष्टी गमवतात तसेच काही रुग्णांच्या जबडा आणि नाकाची हाडेही वितळतात, जर रुग्ण वेळेवर बरा होत नसेल तर मृत्यु देखील होऊ शकतो. येणाऱ्या काळात म्युकरमायकोसिस या फंगल इंफेक्शनचा धोका वेळीच ओळखुन त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
 म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) सारख्या आजारावर उपचार करण्याकरीता अद्ययावत स्वतंत्र कोविड रुग्णालया प्रमाणे डेडिकेटेड म्युकरमायकोसिस सेंटर  रुग्णालयाची स्थापना करावी. तेथे कान, नाक, घसा तज्ञ (ENT), नेत्रतज्ञ, त्वचारोग तज्ञ तसेच दंत चिकीत्सक डॉक्टरांची नियुक्ती करावी. म्युकर मायकोसिस सारख्या फंगल इंफेक्शनचा धोका हाताळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रविष्ठ करुन न घेता एक स्वतंत्र ओपीडी विभाग स्थापन करावा.
 म्युकरमायकोसिस या फंगल इंफेक्शनवर नियंत्रण मिळविण्याकरीता अँफोटेरेसिन बी (Amphotericin B) हे इंजेक्शन उपयुक्त ठरत आहे. सदर इंजेक्शनचा आता तुटवडा असून यासाठी येणाऱ्या काळातील परिस्थिती लक्षात घेता सदर अँफोटेरेसिन बी इंजेक्शनचा जास्तीत जास्त पुरवठा व साठा करावा. जिल्ह्यातील कान, नाक, घसा तज्ञ (ENT), नेत्रतज्ञ, त्वचारोग तज्ञ व दंत चिकित्सक (Dentist)
यांच्याकडून म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या आजाराने बाधित रुग्णांची दररोज माहिती मागवून त्या रुग्णांचे उपचार या  डेडिकेटेड म्युकरमायकोसिस हॉस्पिटलमध्ये विनाविलंब करण्यात यावा, असे खा.हिना गावित यांनी म्हटले आहे. हे पत्र  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, सचिव, आरोग्य विभाग तसेच जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना दिले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार