सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: प्रवाशांसह क्रुझर दरीत कोसळली 8 जागीच ठार 14 जखमी

नंदुरबार - जिल्ह्यातील तोरणमाळच्या अतिदुर्गम सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक करणारी खाजगी क्रुजर गाडी दरीत कोसळुन आठ जणांचा मृत्यू झाला.

Nandurbar MH
  • Jul 19 2021 10:14AM

नंदुरबार - जिल्ह्यातील तोरणमाळच्या अतिदुर्गम सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक करणारी खाजगी क्रुजर गाडी दरीत कोसळुन आठ जणांचा मृत्यू झाला. तर चार प्रवाशी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या क्रुझर गाडीतून 15 हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते व ते सर्व जखमी झाल्याचे समजते.
अतिशय खडतर असलेल्या या रस्त्यावर अवघ्या सहाच महिन्यात हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने आणि खडतरही असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी मध्यप्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातील एक भजनी मंडळ नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी येत होते. हे भजनी मंडळ आणि काही प्रवासी यांचा समावेश असलेली क्रुझर गाडी सिंदिदिगर घाटातून घेऊन जात असताना आज रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. गाडीतील प्रवासी अक्षरश: फेकले गेले. त्यापैकी 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 4 जण गंभीर जखमी आहेत.
पोलिस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य राबवत आहेत. जखमींना तोरणमाळ, म्हसावद याठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येत आहे. जिल्हा मुख्यालयातुन पोलिस अधिक्षकांसह अनेक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार