सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भावासह आई-वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले; मोठ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार - शहादा तालुक्यातील लोंढरे येथील एका शेतकरी कुटुंबातील आई, वडील व लहान मुलाने एकाचवेळी जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना दहा दिवसांपूर्वी घटली होती.

Nandurbar MH
  • Aug 1 2021 7:40PM

नंदुरबार - शहादा तालुक्यातील लोंढरे येथील एका शेतकरी कुटुंबातील आई, वडील व लहान मुलाने एकाचवेळी जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना दहा दिवसांपूर्वी घटली होती. ही दुर्घटना मोठ्या मुलाने छळ केल्यामुळेच घडल्याचे पोलीस तपासात आढळले म्हणून आज मोठ्या मुलाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
तथापि आई-वडिलांचा मृतदेह आढळलेला नाही. ते बेपत्ता असल्याने पोलिस शोध घेत आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जुलै 2021 रोजी हे आत्महत्येचे प्रकरण घडले होते. त्याची पार्श्वभूमी अशी की, लोंढरे (ता. शहादा)येथील नथा बुधा माळी (वय ५७), पत्नी सखुबाई नथा माळी (वय ५२), मुलगा गोपाळ नथा माळी (वय ३५) हे तिघे (दि.२२)  बाहेर गावी जात असल्याचे सांगत सकाळी घरून निघाले. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतले नाही. त्याच दरम्यान सायंकाळी सोशल मीडियावर  गिधाडे (ता. शिरपूर) येथील तापी नदीपात्रात कुणीतरी मोटारसायकल उभी करुन उडी टाकली असल्याची माहिती क्लिपद्वारे फिरत होती. त्यात मोटरसायकलचा क्रमांक दिसल्याने संबंधितांना पाचारण करण्यात आले. तेथे सदर घटना निष्पन्न झाली. परंतु पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तापी पात्रातून फक्त गोपाळ माळी यांचा मृतदेह हाती आला. नाथा वाघ तथा माळी आणि सखूबाई माळी या दाम्पत्याचा मात्र मागमूस लागला नाही. दरम्यान बेपत्ता दाम्पत्याचा मोठा मुलगा संजय नथा माळी हा वडीलांना आणि भावाला कौटुंबिक वादातून नेहमी मारहाण करीत होता व त्रास देत होता असे पोलीस तपासात आढळून आले. नथा बुधा वाघ वय :- ५८ २) सखुबाई नथा वाघ वय :- ५५ दोन्ही रा. लोंढरे ता. शहादा यांचे मृतदेह अदयाप पावेतो मिळून आलेले नसून शोध सुरू आहे. दरम्यानसदर गुन्हा शिंदखेडा पोस्टेला वर्ग होवून मोठा मुलगा संंजय वाघ याच्या विरोधात तिघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अटक करण्याात आली आहे. तपासी अधिकारी विक्रांत कचरे अधिक तपास करीत आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार