सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार:कुत्र्यांच्या चाव्याने मृत्यू झाल्याचे प्रकरण; दोन उपोषणार्थी रुग्णालयात दाखल

नंदुरबार - येथील नगरपरिषदेबाहेर चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या दोन उपाषणीर्थींची प्रक्रुती खालावली.

Nandurbar MH
  • Dec 17 2020 10:43AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - येथील नगरपरिषदेबाहेर चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या दोन उपाषणीर्थींची प्रक्रुती खालावली. म्हणून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. कुत्र्यांनी चावे घेतल्यामुळे झालेला मृत्यू व त्यास कारणीभूत असलेली बेकायदा मांसविक्री या अनुषंगाने हे उपोषण करण्यात आले. 
नंदुरबार शहरात अनेक महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी ऊच्छाद मांडला आहे. नगरपरिषदेने मात्र याचे गांभीर्य ठेऊन ऊपाययोजना केलेल्या नाहित. अशातच पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने पाच वर्षाची बालिका हिताक्षी माळी हिचा दोन आठवड्यापूर्वी मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी देखील भटक्या कुत्र्यांचा झुंड आडवा आल्याने बलराज राजपूत या तरूणाला जीव गमवावा लागला होता. यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया ऊमटत आहेत. या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदु सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. मयतांच्या पालकांना आर्थिक भरपाई द्यावी, जागोजागी ऊघड्यावर बेकायदा मांसविक्री करणाऱ्या गाड्या बंद कराव्या आदी मागण्या त्यांनी सातत्याने मांडल्या आहेत. आज चार दिवस उलटूनही नगर परिषदे कडून मात्र दखल घेतली गेलेली नाही. दरम्यान आज बुधवार रोजी उपोषणकर्ते मुकेश माळी आणि मोहित राजपूत यांची प्रकृती खालावली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातही उपोषण सुरू ठेवल्याचे त्यांनी कळविले आहे. तर उपोषण स्थळी हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, मयुर चौधरी यांनी उपोषण सुरू ठेवले आहे. आज नगराध्यक्षा यांनाही निवेदन देण्यात आले. नंदुरबार नगर परिषद प्रशासनाने दि. १४ डिसें. ला मागण्यांवर करत असलेल्या कारवाई विषयी कळवले असले तरी त्यावर समाधान न झाल्याने उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यात म्हटले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांनाही ई-मेल द्वारे निवेदन पाठवल्याचे समितीने कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार