सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबार: रेमडिसीवरचा काळाबाजार करणारा पोलिसांच्या जाळयात*

नंदुरबार - काळाबाजार करणारे कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याने रुग्णांना वेळेवर इंजेक्‍शन मिळत नाहीये.

Nandurbar MH
  • Apr 17 2021 11:29AM
सुदर्शन न्युज - केतन रघुवंशी (नंदुरबार)
नंदुरबार - काळाबाजार करणारे कृत्रिम टंचाई  निर्माण करत असल्याने रुग्णांना वेळेवर इंजेक्‍शन मिळत नाहीये. म्हणून सतर्क झालेल्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून रेमडिसीवरचा काळाबाजार करणाऱ्या एकाला अटक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १६ एप्रिल २०२१ रोजी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग एच राजपुत यांना एक अज्ञात इसम रेमडिसीवर च्या बाटल्या (व्हायल) अधिक किमंती मध्ये विक्री करण्या करिता येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या बातमीनुसार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने स्वामी समर्थ मंदिरासमोर शतायु हॉस्पीटल समोर सापळा लावुन थांबले. हिरो होन्डा ग्लॅमर मोटारसायकल क्र. एम एच ३९ एल ३७१६ हिच्याने  आलेल्या तरुणास त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव रतिलाल देवराम पवार वय ३० वर्ष रा. सावखेडा ता.शहादा जि. नंदुरबार असे सांगितले. त्याच्या मोटारसायकलच्या नंबरची मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदरची मोटारसायकलही तिच असल्याने त्याची पंचांसमक्ष अंग झडती घेण्यात आली. त्याच्या ताब्यात असलेले रेमडिसीवर इंजेक्शन बाबत विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यास पोलीसी खाक्या दाखवला असता, त्याने सदरचे रेमडिसीवर इंजेक्शन एका व्यक्कीला १२००० रुपये किमंती मध्ये विकणार होतो. असे सांगितले. कुठल्या पेशेन्टच्या नातेवाईकास विकणार होता तसेच इंजेक्शन कोठुन आणले त्याबाबत विचारपुस करता, त्याने त्याबाबत काही एक उपयुक्त माहिती दिली नाही. त्याच्या ताब्यातुन एक रेमडिसीवर इंजेक्शन,  १०००० रुपये किमंतीचा मोबाईल व ३०००० रुपये किमंतीची मोटारसायकल, २०० रुपये रोख असा एकूण ४०२००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरुध्द शहादा पोलीस ठाण्यात जीवनाश्वक वस्तुचे अधिनियम १९५५ चे उल्लंघन, दंडनियम कलम ७ (१)(a)(ii), औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ चे कलम १८ (सी) शिक्षा कलम २७ (बी) (ii), १८ ए उल्लंघन कलम २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी नंदुरबार जिल्हयातील नागरीकांना आवाहन केले आहे की, कोविड १९ च्या पेशंटला आवश्यक असणारे रेमडिसीवर शासकीय किमतीपेक्षा जास्त दराने कोणी विकत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक पोलीसांना किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे ०२५६४ २१०१०० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार