सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*असाही कोरोना इफेक्ट: शहादा तालुक्यातील अनेक गावांनी नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारलीच नाही!*

नंदुरबार - झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत असल्यामुळे शहादा तालुक्यात एकामागून एक गावे बाधित होण्याचा सपाटा लागला आहे.

Nandurbar MH
  • Apr 14 2021 5:18PM

नंदुरबार - झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत असल्यामुळे  शहादा तालुक्यात एकामागून एक  गावे बाधित होण्याचा सपाटा लागला आहे. त्याच बरोबर मृत्यूची संख्या देखील वेगाने वाढत असून नव्या वर्षाच्या स्वागताच्या प्रसंगीच दुःखात आणि सुतकात लोटलेल्या परिवारांची संख्या वाढली आहे. परिणामी बहुसंख्य गावांमध्ये गुढीपाडवा साजरा झालाच नसल्याचे शहादा तालुक्यात आढळून आले.

गेल्या चार महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहादा तालुक्यात निधन पावणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. १८० पैकी जवळपास 172 गावात बाधित आढळून मृत्यूच्या घटना घडल्या आहेत  केवळ आठ गावे अद्याप सुरक्षित राहिल्याचे म्हटलं जात आहे. शासकीय अहवालानुसार शहादा तालुक्यात आतापर्यंत 9 हजार100 बाधित आढळले. पैकी 6 हजार बरे झाले तर 3 उपचार घेत आहेत. कोरणा मुळेे मृत्यू झालेल्यांंची संख्या शासकीय रेकॉर्डवर 136 दिसते. वास्तवात सुरत बडोदा इंदोर आणि अन्य ठिकाणी परस्पर झालेलेे मृत्यू लक्षात घेता हेी संख्या जास्त आहे.
 कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाची बहिण तर कोणाचे नजीकचे नातेवाईक आदींचे निधन या ना त्या कारणाने झाले आहे. गाव अन गाव कोरोना बाधितांचे दु:ख झेलत आहे. थोड्या थोड्या दिवसाच्या अंतराने एकाच गावातील अनेक घरात मृत्यू घडल्यामुळे गावची गावं सुतकी बनली आहेत. परिणामी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढीपाडव्याची गुढीच उभारली नसल्याचे दृश्य अनेक गावात पहायला मिळाले. गावागावात दुःखाचे सावट असल्याने ज्यांच्या घरी दुःखद घटना घडली नाही  नाही अशा लोकांनी सुद्धा या वर्षीचा गुढी पाडवा मनवला नाही.  लोणखेडा मसावद सारख्या मोठ्या गावांपासून छोट्या पाड्यापर्यंत तसे दिसून आले.
 हिंदू संस्कृती प्रमाणे घराबाहेर गुढी व तोरणलावूनगुढी पाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण कोरोनाने तालूक्यातील बहुसंख्य गावातील घराच्या बाहेर गुढी व तोरणाला पारखे केले आहे. नजिकच्या कालावधित जवळचे कोणी मयत झाले असल्यास अजूनही काही गावांमधे सण साजरा न करण्याची प्रथा आहे. कोरोनाने तर अनेकांना दुःखाच्या खाईतच ढकलले असल्याने पाडवा नावालाच साजरा झाला.
रोष व्यक्त करणाऱ्या व्यक्तींचा आरोप आहे की प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यातच त्यासाठीचे निर्णयही विलंबाने घेतला जात आहे. त्यामुळे बेड आभावी रूग्णांना धुळे, नाशिक, पुणे, सुरत, बडोदा, इंदोर आदी शहरांमध्ये उपचारासाठी न्यावे लागत आहे. कोरोनाच्या या विक्राळ स्वरूपाने अनेक वृद्धांसह तरूणांचा बळी घेतला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार