सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबार: वीज कोसळल्याने शेतमजुराचा जागीच मृत्यू*

नंदुरबार- जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाने हजेरी लावली. परंतु याच दरम्यान वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला.

Nandurbar MH
  • Apr 14 2021 5:56PM

 नंदुरबार- जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाने हजेरी लावली. परंतु याच दरम्यान वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे ही घटना घडली.
अधिक वृत्त असे की, नंदुरबार जिल्हयात 14 आणि 15 एप्रिल  असे दोन दिवस वादळीवाऱ्यासह पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार आज अचानक ढगाळ वातावरण बनले. वीजांच्या कडाकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जिल्हयातील काही भागात तुरळक पाऊस झाला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्टयात वीजांचा कडकडाट तीव्र स्वरूपात झाला. त्याप्रसंगी तालुक्यातील शनिमांडळ-रजाळे फाटयावर राजू भरवाड यांच्या शेतात शनिमांडळ, तिलाली येथील रविंद्र रामदास गिर (३२) हा मजूरी करीत होता. त्याच्या अंगावर वीज कोसळली व त्याचा जागीच मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटना घडताच शनिमांडळ, तिलाली, रजाळे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार