सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*कोरोना संसर्ग शून्यावर आणण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करा* *पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचे जिल्ह्यातील जनतेला आवाहन*

नंदुरबार - जिल्ह्यातील नागरीकांनी कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा

Nandurbar MH
  • Apr 25 2021 8:48PM


नंदुरबार - जिल्ह्यातील नागरीकांनी कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी मास्क घालणे,  हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्यासूचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनधी, पदाधिकारी आणि नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्राद्वारे केले आहे.

पालकमंत्री म्हणतात, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कुणालाही गंभीर स्वरूपाचा त्रास झालेला नाही. लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास होत नसून काहींना होणारा सौम्य स्वरूपातील त्रास हा स्वाभाविक आणि उपचारांनी बरा होणारा आहे. 

 लस संपुर्ण सुरक्षीत असून  नागरिकांनीअफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसिकरण करुन घ्यावे. लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असून त्यानंतर दोन आठवड्यानंतर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये आवश्यक बदल होतील. लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास अशी व्यक्ती मृत्युच्या दारापर्यंत जात नाही व औषधोपचाराने बरी होते असे आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. 

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी स्वतः प्रथम लसीकरण करून आपल्या भागातील नागरिकांना आदर्श घालून द्यावा, त्यांच्या मनातील संभ्रम दूर करावे व त्यानंतर लसीकरणाबाबत ग्रामीण भागात प्रचार- प्रसार करून शासकीय यंत्रणेच्या समन्वयाने शिबिरांचे आयोजन करावे.  जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव सारख्या दुर्गम व अतिदुर्गम भागातदेखील लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने आवश्यक कार्यवाही करावी.

कोरोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार करावा.   आरटीपीसीआर किंवा अँटीजेन टेस्ट केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यास जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये औषधोपचारासाठी दाखल व्हावे .  सर्वच रुग्णांना रेमेडीसेवर औषधाची आवश्यकता नसते हे लक्षात घेणे गरजेचे आहे . 

डॉक्टरांनी रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलनुसार पूर्ण तपासणी किंवा आवश्यक चाचण्या करूनच रुग्णाची स्थिती पाहूनच रेमडीसेव्हीर इंजेक्शनचा वापर करणे आवश्यक आहे. रेमडीसेव्हीर इंजेक्शनमध्ये स्टेरॉईडचा वापर असल्याने आवश्यक नसल्यास त्याचा वापर करू नये.

रेमडीसेव्हीर इंजेक्शन आता बाहेर मिळत नाही .  ते जिल्हा रुग्णालयात फक्त उपलब्ध होईल. आपण कोविड उपचार केंद्रात दाखल असल्यास व आपणास आवश्यकता असल्यास आपणास ते उपलब्ध करून देण्यात येईल. रेमडीसेव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनात वाढ करणे व त्यावरील कर कमी करणे यासारख्या उपाय योजना केंद्र व राज्य शासन करीत आहे. 'रेमडीसेव्हीर’चा  जास्तीत जास्त साठा महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केलेली आहे.

रुग्णाला लक्षणे कधी आढळली, त्याला ऑक्सिजनची गरज आहे का, त्याचे वय अधिक आहे का, त्याला अन्य आजार असून तो लवकर बरा होऊ शकतो का, याचा सारासार विचार केला तर 'रेमडीसेव्हीर'चा योग्य वापर करता येऊ शकतो. असे झाल्यास इंजेक्शनचा दुरुपयोग टाळता येईल. 

कोरोना झाल्याचे निदर्शनास आल्यास नंदुरबार येथील एकलव्य कोविड केअर सेंटर, नवापूर, शहादा येथील कोरोना उपचार केंद्र व जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षात तसेच प्रकाशा येथील अलगीकरण  कक्षात दाखल व्हावे. या ठिकाणी आपल्याला प्राथमिक उपचार देण्यात येतील व आपणास आवश्यकता असल्यास कोविड उपचार केंद्रात स्थलांतरित करण्यात येईल. औषध उपचारादरम्यान आपणास अत्यावश्यक असल्यास त्या ठिकाणी रेमडीसेव्हीर इंजेक्शन देण्याची सुविधा शासनातर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

आपण  स्वतः पीपीई किट घालून जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या कक्षात जाऊन परिस्थिती पाहिली असता त्याठिकाणी कोरोना रुग्णासोबत नातेवाईकांची गर्दी आढळून आली. कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने रुग्णा सोबत नातेवाईकांना आणू नका. या महिन्याच्या सुरुवातीला कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली परंतू आता ती कमी होत असताना दिसत आहे आपण सर्वांनी काळजी घेऊन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या  शून्यावर आणण्याचा निर्धार करू या, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार