सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हक्काचे घरकूल मिळाल्याने राकेशच्या कुटुंबियांना मिळाली सुरक्षा

नंदुरबार : भादवड गावातील राकेश वळवी या दिव्यांग तरुणाच्या घरी त्यांचे आता बाळ उंच झोक्यात निवांत विश्रांती घेऊ शकते

Nandurbar MH
  • Dec 10 2020 11:03AM
नंदुरबार : भादवड गावातील राकेश वळवी या  दिव्यांग तरुणाच्या घरी त्यांचे आता बाळ उंच झोक्यात निवांत विश्रांती घेऊ शकते. आईला बाळाच्या आरोग्याची पूर्वीसारखी चिंता नाही. शबरी आवास योजने अंतर्गत हक्काचे घरकूल मिळाल्याने संपुर्ण कुटुंबाला सुरक्षा मिळाली आहे. पक्के घर लहान बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरले आहे.  

 राकेश एका अशासकीय संस्थेत मानधनावर काम करतात. त्यांना एक तान्ही आणि एक 4 वर्षाची अशा दोन मुली आहेत. तुटपुंज्या मानधनावर घर चालविणे कठीण असताना पक्के घर बांधणे त्यांच्यासाठी केवळ स्वप्न होते. जुने घर कच्चे कौलाचे होते. पावसाळ्यात घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागे. त्यात रात्रीच्या अंधारात लहान मुलगी जमिनीवर खेळताना तिच्या सुरक्षेचीही चिंता होती. 
गेल्या वर्षाच्या अखेरीस राकेश यांना शबरी आवास योजनेतून घरकूलाचा लाभ देण्यात आला. स्वप्नातले घर उभे रहात असताना पाहून त्यांचा उत्साह वाढला. त्यांनी स्वत: एकेक पैसा एकत्रित करून मिळालेल्या 1 लाख रुपयांच्या अनुदानात 50 हजारांची भर घातली आणि मनासारखे घर बांधून घेतले. त्यांना उर्वरीत 20 हजाराचा हप्तादेखील मिळणार आहे.

स्वत: भर घातल्याने एक खोली अतिरिक्त बांधता आली. त्यात मिनी चक्की सुरू केल्याने उत्पन्नातही भर पडली आहे. सौभाग्य योजनेतून त्यांना विद्युत जोडणी देण्यात आली. उज्वला योजनेतून गॅस जोडणी मिळाल्याने गृहीणीचा त्रासही कमी झाला आहे. मोकळ्या हवेशीर घर मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने फायद्याचे ठरत आहे.

भादवड गावातील इतर 7 दिव्यांग आदिवासी लाभार्थ्यांनादेखील शबरी आावास योजनोचा लाभ देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतदेखील 312 लाभार्थ्यांना घरकूल मिळाल्याने या कामगिरीसाठी ग्राम विकास अधिकारी अशोक सुर्यवंशी यांना केंद्र सरकारतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येक बेघराला घरकूल देण्यासाठी शासनाने महाआवास अभियानदेखील सुरू केले आहे. त्यामुळे राकेशसारख्या अनेक गरजूंना आपल्या हक्काचे घर मिळू शकेल.

राकेश वळवी, लाभार्थी-हक्काच्या घरामुळे मुलांना सुरक्षा मिळाली. कच्चे घर धोकादायक होते आणि वावरतानाही अडचणी येत. नव्या घरात इतरही सुविधा निर्माण करता आल्याने मुलांची वाढ चांगल्याप्रकारे होऊ शकेल. शबरी आवास योजना नसती तर घर बनविणे शक्य नव्हते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार