सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबार:बेडीसह पसार आरोपी सुरतेत पकडला*

नंदुरबार- न्यायालयात नेले जात असताना हातातील बेड्यांसह पसार झालेल्या आरोपीला सुरत जिल्ह्यात पकडले.

Nandurbar MH
  • Apr 25 2021 9:01PM

नंदुरबार-  न्यायालयात नेले जात असताना हातातील बेड्यांसह पसार झालेल्या आरोपीला सुरत जिल्ह्यात पकडले. दहा दिवसांपूर्वी हे पलायन नाट्य घडले होते.
      मोलगी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील आरोपी दिनेश रायसिंग वळवी रा. वलंबा यास दिनांक रोजी 6 एप्रिल 2021 रोजी सुनावणी साठी अक्कलकुवा न्यायालयात आणले असतांना पोलीस पथकाची नजर चुकवून बेडीसह पळून गेला होता. सदर आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंग राजपुत यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंग राजपुत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे 3 पथके तयार करुन आरोपीचा ठाव ठिकाणा काढण्यासाठी तपास केला. दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी गोपनिय बातमीदारामार्फत त्यांना माहिती प्राप्त झाली. हवालदार सजन वाघ, पोलीस नाईक विकास अजगे, किरण पावरा यांचे पथकाने भेस्तान जिल्हा सुरत येथे सापळा रचून आरोपीस जेरबंद केले. पुढिल तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार