सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

थुंकणे पडले महागात; लाकडाने मारहाण करून घेतला जीव

नंदुरबार - केवळ अंगणात थुंकला याचे निमित्त घडले आणि 6 जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत थुंकणाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.

Nandurbar MH
  • Dec 18 2020 5:16PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार  - केवळ अंगणात थुंकला याचे निमित्त घडले आणि 6 जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत थुंकणाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात ही घटना घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील इस्लामपूर येथील रहिवासी अंबालाल उर्फ सुभाष शिवराम वळवी (वय 27) हा 16 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता राहत्या घरासमोरच्या दुकानात गेला होता. जगन पावरा यांच्या दुकानात उभा असताना अंबालाल वळवी हा अंगणात थुंकला. या दुकाना समोर राहणारा सागर रायसिंग ठाकरे लगेच धावून आला. मला पाहूनच थुंकला असे म्हणून वाद सुरू केला. अशातच सागर ठाकरेने लाकूड आणून अंबालालच्या डोक्यावर वार केले. दुकानदार जगन पावरा त्यांना सोडवत असतानाच रायसिंग तारासिंग ठाकरे, गोरख भालसिंग ठाकरे,  भालसिंग रामसिंग ठाकरे,  पिंट्या लालू ठाकरे,  लालू रामसिंग ठाकरे हे 5 जण धावून आले. त्यांनीदेखील जखमी अंबालाल याला जबर मारहाण केली. अंबालाल च्या पत्नीला देखील त्यांनी मारहाण केली. नंतर ग्रामस्थांनी जखमी अंबालाल याला म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु उपचार चालू असताना काल दिनांक 17 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. म्हसावद पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद असून मसावद पोलिसांनी काल रात्री उशिरा सर्व 6 आरोपींना अटक केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार