सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिनासाठी महापालिकेचा निधी

नगरसेवक विकास डोळस यांची आग्रही मागणी - सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते उपसूचनेला मंजुरी

Sudarshan MH
  • Jan 20 2021 4:39PM
 
पिंपरी । प्रतिनिधी दिपक चव्हाण पुणे
 
 
पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ आहे. प्रतिवर्षी फाल्गून आमावस्येला बलिदान दिन अर्थात पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मदतनिधी देण्यात येणार आहे. 
तुळापूर येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. नगरसेवक विकास डोळस यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी करताना सुविधा उपलब्ध करण्याबाबत निधीअभावी अडचणी येत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ग्रामपंचायतला प्रतिवर्षी मदत करावी, अशी मागणी केली. 
 
 
त्यामुळे पुण्यतिथीदिनी समाधी स्थळाचे ठिकाणी मंडप व्यवस्था, लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी, हार-फुले इत्यादी करिता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून ५ लाख रुपये प्रतिवर्षी देण्यात येणार आहेत. महापालिका हद्दीबाहेर मदत करण्यात येणार असल्यामुळे महापालिका अधिनियमाचे कलम ८९ नुसार मान्यता देण्यात यावी, अशी उपसूचना नगरसेवक विकास डोळस यांनी सर्वसाधारण सभेमध्ये मांडली. या उपसूचनेला अनुमोदक म्हणून सागर गवळी यांनी स्वाक्षरी केली आहे. सभागृहाने या विषयाला मंजुरी दिली आहे. माजी उपसरपंच मारुती शिवले म्हणाले की, स्व. अण्णासाहेब मगर यांनी पूर्वी बलिदान दिन आणि पुण्यतिथी साजरी करण्याबाबत मदत करण्याची सुरूवात केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा भाग हवेली तालुक्यात येतो. छत्रपती संभाजी महाराज देशवासीयांच्या अस्मितेचा विषय आहे. जिल्हा प्रशासनाकडून १ लाख रुपयांचा निधी मिळतो. मात्र, पुण्यतिथी दिनी तुळापूर येथे सुमारे दीड लाख शिवप्रेमी येत असतात. त्यांना जेवन, मंडप, स्वच्छतागृह, लाईट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी कमी पडतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने दरवर्षी आम्हाला ठराविक निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे.
 
 
स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण अन् समाधीस्थळाला मदतही…
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून मोशी- बोऱ्हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच १४० पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये तमाम युवकांचे प्रेरणास्थळ साकारले जात आहे. आता आमदार लांडगे यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या समधीस्थळी तुळापूर येथे बलिदान दिन आणि पुण्यतिथीनिमित्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार