सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ' चित्रपटाचे 6 डिसेंबर रोजी समाज माध्यमांवर प्रसारण

मुंबई, दि. 30 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, दि.६ डिसेंबर २०२१ रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Nandurbar MH
  • Dec 1 2021 11:28AM

 
            मुंबई, दि. 30 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, दि.६ डिसेंबर २०२१ रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ' या चित्रपटाचे  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या व्टिटर, फेसबुक तसेच युट्यूब या समाजमाध्यमांवर सकाळी 11 वाजता प्रसारण होणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची निर्मिती संयुक्तरित्या केली आहे.

              स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विविध क्षेत्रातील अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी,समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी  'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ' हा चित्रपट नक्की पहायला हवा.

            'डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ' या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भुमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथालेखन सोनी तारापोरेवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपुर, फोटोदिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.  
                    6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR, https://www.facebook.com/MahaDGIPR,
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR या समाजमाध्यमांवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ'  हा चित्रपट नक्की पहा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार