सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

असा आहे मुंबई अधिवेशनाचा पहिला दिवस...

विधानसभेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता, तर विधान परिषदेच्या कामकाजाला दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विधेयके सादर करण्यात आली.

Snehal Joshi .
  • Dec 14 2020 10:28PM
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २ दिवसांच्या होत असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केवळ शोकप्रस्ताव सादर करण्यात आले. शोकप्रस्तावांवर दोन्ही सभागृहांतील सदस्यांची भाषणे झाली. सभागृहात विधेयके सादर करण्यात आली; मात्र सभागृहाच्या प्रथेनुसार त्यांवर चर्चा घेण्यात आली नाही. १४ डिसेंबर या दिवशी ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने विधानसभेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता, तर विधान परिषदेच्या कामकाजाला दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विधेयके सादर करण्यात आली. या सर्व विधेयकांवर १५ डिसेंबर या दिवशी चर्चा घेण्यात येणार आहे. विधेयके सादर केल्यानंतर दोन्ही सभागृहांतील तालिका सभापतींची नावे घोषित करण्यात आली. शोकप्रस्तावावरील भाषणांनंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार