सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेसकोर्सवर पुन्हा भव्य उपचार केंद्र उभारणी

मुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर पालिके ने गेल्या वर्षी उभारलेले भव्य करोना उपचार केंद्र जानेवारी महिन्यात बंद के ले असताना आता पुन्हा एकदा याच जागी नवे करोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

Sudarshan MH
  • May 1 2021 1:32PM

मुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर पालिके ने गेल्या वर्षी उभारलेले भव्य करोना उपचार केंद्र जानेवारी महिन्यात बंद के ले असताना आता पुन्हा एकदा याच जागी नवे करोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी महालक्ष्मी रेसकोर्सवर उभारलेल्या केंद्रात एकही रुग्ण दाखल झाला नसल्याने हे उपचार केंद्र बंद करण्यात आले होते.
गेल्या वर्षी महालक्ष्मी येथे ७०० खाटांचे उपचार केंद्र बांधण्यात आले होते. सामाजिक दायित्व निधीतून  एका बांधकाम व्यावसायिकाने हे केंद्र बांधून दिले होते. गेल्या वर्षीही करोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर हे केंद्र वापरात आणण्यात आले. त्याचप्रमाणे वरळी परिसरात पोद्दार, एनएससीआय, नेहरू सायन्स सेंटर ही मोठी केंद्र असल्यामुळे या केंद्राचा वापर झाला नाही. तेथे वर्षभरात एकही रुग्ण दाखल झाला नाही. ते कारण पुढे करून जानेवारीत हे केंद्र पाडून टाकण्यात आले. आता पुन्हा एकदा शहरातील रुग्णसंख्या काहीशी घटू लागल्यानंतर त्याच जागी नव्याने केंद्र उभे करण्याचा घाट पालिकेने घातला आहे. त्याच्या स्थापत्य कामांसाठी पालिके च्या आरोग्य पायाभूत सुविधा विभागाने निविदा मागवल्या आहेत. 

तिसरी लाट आल्यास सुविधांची वानवा भासू नये म्हणून केंद्र उभारण्याऱ्या पलिकेने दुसऱ्या लाटेच्या तोंडावर हे केंद्र पाडून टाकले होते.दरम्यान,नव्याने उभ्या करण्यात येणाऱ्या केंद्रात अतिदक्षता विभागाच्या २०० खाटा असतील तर ३०० खाटा या प्राणवायूसह असतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.  करोनाची लाट ओसरली तरी पुढची लाट कधीही येऊ शकत असल्यामुळे पूर्वतयारीकरिता अधिक  रुग्णशय्यांची तयारी असावी म्हणून हे केंद्र उभारण्याचा पालिकेचा विचार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार