BMC कोरोना चाचण्यांचा वेग वाढवणार, सध्या २० ते ३० हजार चाचण्या
मुंबई: मुंबईतील रुग्णसंख्येत झालेली घट ही बाब जरी दिलासादायक असली तरी सध्या चाचण्या करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
मुंबई: मुंबईतील रुग्णसंख्येत झालेली घट ही बाब जरी दिलासादायक असली तरी सध्या चाचण्या करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिवसाला फक्त 20 ते 30 हजाराच्या दरम्यान चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, आता चाचण्यांचे प्रमाण पुन्हा वाढवणार असून कोरोना व्यक्तींच्या अतिसंपर्कातील आणि संशयित कोविड रुग्णांच्या चाचण्या करण्यावर पालिका प्रशासन भर देणार आहे. त्यामुळे, एका ही रुग्णाला न सोडण्याचा आणि कोणतीही उणीव न सोडण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने आखले आहे.
फेब्रुवारी महिन्यात मुंबईची रूग्ण संख्या 11 हजारावर होती. सध्या मात्र कोरोना रूग्ण संख्या सातत्याने कमी होत आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे गेल्या आठवड्यापासून चाचण्या करण्याची गती मंदावली असल्याचे समोर येत आहे. यावर कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असल्याचे पालिका म्हणत असली तरीही आता पुन्हा चाचण्या करण्याचा वेग वाढवून रूग्ण हेरण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प