सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाहीतर लोक ऑफिसला कसे जाणार?; मुंबईतील निर्बंधांवरून काँग्रेस नेत्याचाच ठाकरे सरकारला सवाल

मुंबई: राज्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे.

Sudarshan MH
  • Jun 7 2021 2:12PM


मुंबई: राज्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. संसर्गाचा वेग आणि बाधिताची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध सैल करण्यास सुरूवात केली आहे. हे करत असताना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला निर्बंध शिथिल करण्यास मार्गदर्शक ठरणारा कृती कार्यक्रम तयार केला आहे. निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच गट तयार केले असून, त्यात निकषानुसार जिल्ह्यांची वर्गवारी केली जाणार आहे. मुंबई या तिसऱ्या गटात असून, काही प्रमाणात निर्बंध शिथिल झाले आहेत. मात्र, लोकल बंद असल्याने काँग्रेसचे नेते संजय निरुमप यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे.

संजय निरुमप यांनी ट्वीट करत मुंबईतील निर्बंधांकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. “मुंबईमध्ये लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. पण, यामुळे लोकांना त्रासच जास्त होणार आहे. कार्यालये उघडली जात आहेत, पण सार्वजनिक वाहतूकच नाही. एकतर बसेसची संख्या वाढविण्यात यावी किंवा नियंत्रित प्रमाणात लोकल सुरू करण्यात यावी. नाहीतर लोक ऑफिसला कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसलाही एक मर्यादा आहे,” असं म्हणत निरुमप यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार